Water News : शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्र, निगडीतील जलशुध्दीकरण केंद्र आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेमधील दुरुस्ती गुरुवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी शहराला होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहील, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.

Pimpri : पालखी सोहळ्याला पिंपरी-चिंचवडकरांचा भक्तीभावाने निरोप

रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्रात विद्युत विषयक दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. सेक्‍टर 23 निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत व पाणी पुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. तसेच, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्ती देखील करण्यात येणार आहे.

त्यामुळे गुरुवारी (दि. 15) पिंपरी-चिंचवडला सकाळी होणारा पाणी पुरवठा नियमिती वेळेत होईल. मात्र, सायंकाळी होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. 16) सकाळी होणारा पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.