Weather Report : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्‍यता

Chance of torrential rains in Konkan, Goa, Central Maharashtra and sparse places in Vidarbha

एमपीसी न्यूज- कोकण – गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण-गोव्यात बहुतांश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: दापोली, हर्णे, उरण 10 प्रत्येकी, खेड, श्रीवर्धन, वसई 7 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), कानकोन, मुंबई (कुलाबा), पणजी (गोवा) 6 प्रत्येकी, चिपळूण, म्हापसा, विक्रमगड 5 प्रत्येकी, अलिबाग, महाड, मंडणगड, म्हसळा, मुरुड, पेण, संगमेश्वर देवरुख, सुधागड पाली, तळासरी 4 प्रत्येकी, जव्हार, कर्जत, माणगाव, पालघर, ठाणे 3 प्रत्येकी, भिरा, भिवंडी, डहाणू, दोडा मार्ग, गुहागर, माथेरान, पनवेल, राजापूर, रोहा, सांगा शहापूर, वेंगुर्ला 2 प्रत्येकी, देवगड, खालापूर, कुडाळ, मडगाव, मार्मगोवा, मुरबाड, पेडणे, पोलादपूर, केपे, रत्नागिरी, उल्हासनगर, वालपोई 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: इगतपुरी, ओझरखेडा 3 प्रत्येकी, लोणावाला (कृषी) 2 प्रत्येकी, महाबळेश्वर, मुळदे, पेठ, शहादा, सुरगाणा 1 प्रत्येकी.

मराठवाडा: बीड 4, धारूर 2, चाकूर, लातूर 1 प्रत्येकी.

विदर्भ: चिखली 1.

घाटमाथा: कोयना (पोफळी) 6, लोणावळा(ऑफिस), अम्बोणे, ताम्हिणी, ताम्हिणी 3 प्रत्येकी, लोणावळा(टाटा), शिरगाव, वळवण , इंगरवाडी, कोयना (नवजा) 2 प्रत्येकी, दावडी, भिवपुरी, खंद 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

28 जुलै: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

29-30 जुलै: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

31-जुलै 1ऑगस्ट : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

इशारा:

28 जुलै : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

29 जुलै : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

30 जुलै : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

31 जुलै-1 ऑगस्ट : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनजा व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटसह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसाची शक्यता. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तविली आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.