Pune : बांधकाम साइटवर खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून मजुराच्या मुलाचा मृत्यू

बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कात्रज येथे एका बांधकाम साइटवर काम सुरू असताना खेळत असलेल्या मजुराच्या तीन वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.4) सायंकाळी पाच ते सव्वापाच या दरम्यान घडली.

समर शेख, असे या चिमुकल्याचे नाव असून याप्रकरणी त्याचे वडील सुलतान शेख (वय 28, रा. भिलारेवाडी, कात्रज) यांनी फिर्याद दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज येथे भिलारेवाडीत अनिल ज्ञानदेव खोपडे यांच्या चौथ्या माळा असलेल्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. मंगळवारी बांधकाम साईटवर समर हा खेळत असताना तोल जाऊन उघड्या पाण्याच्या टाकीत पडला. त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा ठपका ठेवत बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.