Pimpri: पंतप्रधानांच्या शपथविधीला पाचव्या रांगेत मला जागा दिली होती – शरद पवार

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला मला पाचव्या रांगेत जागा दिली होती. मी आजही चौकशी केली. माझ्या सचिवांना मी आजही संपर्क केला. ते दोनदा राष्ट्रपती भवनात गेले होते. माझी बसण्याची जागा विचारण्यासाठी. माझ्या सचिवाला दोन्ही वेळेस माझी जागा पाचव्या रांगेत असल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तसेच यामध्ये कोणा एकाची चूक झाली असावी?. ती माझ्या कार्यालयाची असेल किंवा त्यांच्या कार्यालयाची. पण, तो विषय इतका मोठा नाही. तो आता संपायला हवा, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला पाचव्या रांगेत स्थान दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत असूनही शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरविल्याचे चर्चा होती. त्यानंतर राष्ट्रपती कार्यालयाने स्पष्टीकरण देत शरद पवार यांना पाचव्या नव्हे तर, पहिल्याच रांगेत स्थान दिल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

  • याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, शपथविधी सोहळ्याला मला पाचव्याच रांगेत जागा दिली होती. मी आजही चौकशी केली. माझ्या सचिवांना मी आजही संपर्क केला. ते दोनदा राष्ट्रपती भवनात गेले होते. माझी बसण्याची जागा विचारण्यासाठी. माझ्या सचिवाला दोन्ही वेळेस माझी जागा पाचव्या रांगेत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुस-यांदा माझे सचिव गेले होते. त्यावेळी नंबर अधिक पुढचा दिला. पण पाचवीच रांग सांगितली होती. माझ्या कार्डवर ‘v’ लिहिले होते.

एवढा मोठा कार्यक्रम असल्यावर अगोदर चौकशी केली जाते. कोणी कोठून यायचे?, कोणत्या गेटमधून गाडी आणली पाहिजे?. त्यामुळे माझ्या कार्यालयाकडून माझे सचिव जागा कोणती आहे. ते विचारायला गेले. त्यांना सांगताना दोन्ही वेळेला पाचव्या रांगेतीलच जागा सांगितली. पण, ठीक आहे.

  • माझ्या मते, हा काही फार महत्वाचा प्रश्न नाही. राष्ट्रपती भवनाचे म्हणणे असेल काही गैरसमज झाला असेल. तर, तो सोडून द्यायचा. हा काही वादाचा प्रश्न नाही. कदाचीत माझ्या कार्यालयाची काही कमतरता असेल किंवा त्यांची कार्यालयाची कमतरता असेल, असेही शरद पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.