Wakad : कंपनीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची पाच कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – फर्निचर आणि अन्य वस्तूंची कंपनी स्थापन करून त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्याचे दाखवून सहा नातेवाईकांनी एका व्यावसायिकाची पाच कोटी सात लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 25 मे 2016 ते 26 नोव्हेंबर 2018 या कालावधीत वाकड येथे घडली.

रमेश श्रीमंत घोलप (वय 50, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रदुम्न निर्मळ, गीता प्रदुम्न निर्मळ, श्रीहरी बापूराव निर्मळ (सर्व रा. वाकड), गुरुलिंग ज्ञानोबा अंदिल, जयराम गुरुलिंग अंदील (रा. भोसरी), दिनेश धुमाळ (रा. वाई, सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. आरोपींनी रमेश यांना फर्निचर आणि अन्य वस्तूंचा व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी ‘श्रीहरी बिझनेस एलएलपी’ ही भागीदारी कंपनी सुरु करायची आहे. त्यासाठी रमेश आणि अन्य दोघांकडून प्रत्येकी दीड कोटी असे एकूण साडेचार कोटी रुपये घेतले.

आरोपींनी बँकेची कागदपत्रे बनवून रमेश यांना कंपनीतून फायदा होत असल्याचे दाखवले. आरोपींनी सर्व रक्कम त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी वापरली. गुंतवलेले साडेचार कोटी रुपये आणि 57 लाख रुपये नफा अशी एकूण 5 कोटी 7 लाख रुपयांची रमेश यांची फसवणूक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.