Maval: कंपनीतून दहा लाखांचा माल चोरून नेण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज –    कंपनीतून दहा लाख 42 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेण्याचा(Maval) प्रयत्न केला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 14) मध्यरात्री मावळ तालुक्यातील मिंडेवाडी येथे टीव्हीएस कंपनीत घडली.

अमोल भालेराव (रा. मिंडेवाडी, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव(Maval) आहे. याप्रकरणी कमलेश अनिलराव पाटील (वय 34, रा. पुनावळे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : ‘हयातीच्या दाखल्यांसाठी’ महापालिका दिव्यांग व्यक्तींच्या दारी; 6699व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल भालेराव याने टीव्हीएस कंपनीतील एका ट्रक मध्ये दहा लाख 42 हजार 720 रुपये किमतीचा माल चोरून भरला. त्यानंतर ट्रक चालकाला फोन करून ट्रक बाहेर घेऊन येण्यास सांगितले. चालक ट्रक बाहेर घेऊन येत असताना गेटवर ट्रक सुरक्षा रक्षकांकडून अडवण्यात आला. तिथे सुरक्षारक्षकांनी चौकशी केली असता चालकाला ट्रक मधील मालाबाबत काहीही माहिती नसल्याचे समोर आले. त्यानंतर कंपनीतील प्रतिनिधींनी मालाची चौकशी केली असता हा माल अमोल भालेराव याने चोरून ट्रकमध्ये भरला असल्याचे समोर आले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.