Pimpri News : शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसचे धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी) धरणे आंदोलन करण्यात आले. ताबडतोब शहरातील पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी महिलांनी केली.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या लाक्षणिक धरणे आंदोलनात सायली नढे, माजी नगरसेविका निर्मला कदम, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, प्रियांका कदम, दिपाली भालेकर, डॉ. मनिषा गरुड, छायाताई देसले, निर्मला खैरे, शिल्पा गायकवाड, सुप्रिया पोहरे, आशा भोसले, प्रियांका मलशेट्टी, आशा काळे, अनिता अधिकारी, लता फर्नांडिस, सीमा हलकट्टी, वैशाली शिंदे, सोनु दमवाणी, अनिता ओव्हाळ, स्वाती शिंदे, पुष्पा गाडे, चतुरा धेंडे, व्दारका गाडे, रुद्रावणी आव्हाड, सुजाता धेंडे, रजीया शेख, द्रौपदी लोखंडे, राणी चंदनशिवे, वंदना चंदनशिवे, दिव्या चंदनशिवे, तेजश्री चंदनशिवे, रेणूका मुखटे, संगीता यादव, रजिया मुजावर, सोनाली गायकवाड, नंदनी विश्वकर्मा, सुमन विश्वकर्मा, चंदन ओव्हाळ, सुमन साळवे, जयश्री सगर, सुमन नाईक, शिला मायकल, मारीया मायकल, अनिता शहाणे, अमृता पारवे, जनाबाई मोरे, रंजना सदामती, आशा पारवे, शकुंतला हटकर, जनाबाई मोरे, सुमन नाईक, सुनिता वाघमारे, संगिता देडेकर, लक्ष्मणी खरकदारे, प्रतिक्षा खरकदारे, रुकसाना शेख, ऋतृजा उबाळे, तृप्ती जाधव, प्रियांका रॉय, अनिता साहनी, मंगल सरोट, शुशीला एकुरके, माया वाघ, अर्चना नहाणे, शोभा क्षिरसठ, शबनम शेख, आरती शुल्का, खुर्शिदा शेख, सादिया शेख आदींसह शहरातील विविध भागातून काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

शहराला दररोज 600 एमएलडी पाणी लागते. यापैकी 30 एमएलडी पाणी एमआयडीसीकडून दिले जाते. उर्वरीत पाणी पवना धरणातून घेतले जाते. महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, भामा आसखेड पाणीपुरवठा योजना आणि आंद्रा धरणातूनही पाणी घेऊन शहरातील नागरीकांना देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. परंतु, मागील पाच वर्षात पवना बंद जलवाहिनी प्रकल्प जैसे थे आहे. भामा – आसखेड – आंद्रा पाणी पुरवठा योजनेसाठी हजारो कोटींचा खर्च करुन अद्यापही प्रकल्प पूर्ण झाले नसल्याने महिला काँग्रेसने निषेध केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.