Delhi News – यमुनेच्या पाण्याची थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

एमपीसी न्यूज – दिल्लीतील (Delhi News) यमुना नदीच्या पाण्याची पातळी ही शुक्रवारी (दि 14) ला 208.46 मीटरपर्यंत कमी झाली परंतु पातळी धोक्याच्या चिन्हाच्या 3.13 मीटर वर आहे. पुराची स्थिती व सतत चालू असलेल्या पावसामुळे शहराच्या रस्त्यांवर पाणी फार तुंबले आहे. गुरुवारी (दि 13) रात्री, नाल्यांमधील पाण्याच्या संभाव्य बॅकफ्लोमुळे नदीच्या पुराचे पाणी हे सर्वोच्च न्यायालयाच्या जवळ पोहोचले होते.

Dighi : पोलिसांनी वाचवले माउलींच्या रथाखाली आलेल्या महिलेचे प्राण; दोन पोलीस जखमी

सर्वोच्च न्यायालयाच्या जवळील मथुरा रोड आणि भगवान दास रोडचा काही भाग पुरामुळे जलमय झाला आहे. मुख्यमंत्र्यांची तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची कार्यालये असलेल्या सचिवालयासह दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या भागात गुरुवारी पूर आला होता.

तसेच शुक्रवारी मुसळधार पावसामुळे राजघाट या परिसरातही पाणी साचले आहे. जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ताज महाल याच्या बागेतही यमुनाने हजेरी लावली असून, तो परिसरही जलमय झाला आहे.

शहरातील काही मुख्य जल शुद्धीकरण प्रकल्प पुरामुळे बंद झाल्याने दिल्लीमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा 25 टक्क्यांनी कमी झाला आहे व  दिल्लीच्या लोकांना पिण्याच्या पाण्याचीही कमतरता जाणवत आहे. लाईफ बोटी, दोरी आणि इतर उपकरणांनी सुसज्ज असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या बारा पथकांनी गुरुवारी दिल्ली अग्निशमन सेवा आणि पोलिसांसोबत बचाव मोहीम केल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.