Chinchwad : मतदारसंघ स्तरावर विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम

एमपीसी न्यूज – 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित (Chinchwad) छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगाने आयोजित केला आहे. त्याअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघ स्तरावरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व नोडल अधिकाऱ्यांची बैठक आचार्य अत्रे रंगमंदिरात संपन्न झाली.

या बैठकीत मतदारांबाबत पडताळणी, मतदार यादीतील छायाचित्र दुरुस्ती, मयत मतदारांची नावे वगळणी, बीएलओ ॲप, मतदार हेल्पलाइन ॲप आदी विषयावर चर्चा झाली. वंचित घटक, महिला, दिव्यांग, तृतीयपंथी यांसाठी विविध कार्यक्रम राबविणे आणि विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांतर्गत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Maharashtra : अखेर राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर; जाणून घ्या सविस्तर

मतदार नोंदणी अधिकारी नीलेश देशमुख, अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी अमोल कदम, श्चेता अल्हाट, सहायक आयुक्त उमेश ढाकणे, शीतल वाकडे, किरणकुमार मोरे, अमित पंडित यांनी मार्गदर्शन (Chinchwad) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.