Yavat Gang Arrested : विद्युत ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

26 गुन्ह्यांतील फरार म्होरक्याकडून आणखी 4 गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज: यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. (Yavat Gang Arrested) 26 गुन्ह्यातील या फरार म्होरक्याकडून आणखी 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. या सर्वांकडून एकूण 3.36 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

दत्ता शिंदे, वय 28 वर्षे, रा. राहू, तालुका दौंड, राज वानखेडे, वय 19 वर्षे, रा. केडगाव, तालुका दौंड, विशाल सोनवणे, वय 30 वर्षे, रा. सासवड, तालुका पुरंदर, महादेव उर्फ सोन्या पवार, वय 29 वर्षे, रा. केडगाव, तालुका दौंड व अमजड खान, वय 40 वर्षे, रा. साईनगर, कोंढवा यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

2 जुलैला मौजे बोरिभादक, तालुका दौंड येथील शेट जमीन गट नं 14/1 मधील शिवाजी गायकवाड यांचे शेतात असलेली डीपी कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्ट्रक्चर वरून नट बोल्ट उघडून खाली पाडले. त्यातील ऑइल सांडून नुकसान केले. तसेच त्यामधील अंदाजे एकूण 100 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या याबाबत यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला होता.

 

 

यवतमाळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव यांना 8 जुलैला बातमीदारमार्फत माहिती मिळाली की डी पी चोरणारा संशयित मौजे राहू मधील शिवाजी चौक येथे येणार आहे.(Yavat Gang Arrested) त्यामुळे पोलीस पथकाने गुन्हे शोध पथकातील पोलीस स्टाफसह तेथे सापळा रचला असता कार मधून चार इसम राहू येथील लक्ष्मी मंदिराजवळ आले. त्याचवेळी गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना मारुती 800 कारसह ताब्यात घेऊन चौकशी केली. दत्ता शिंदे, राज वानखेडे, विशाल सोनवणे व महादेव उर्फ सोन्या पवार यांना ताब्यात घेण्यात आले.

 

या चोरट्यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने राहू, कानगाव, पाटस, कासुर्डी, बोरिभडक, खुटबाव, उंडवडी, कोरेगाव भिवर या गावात असे यवतमाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 28 रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. त्यांनी गुन्ह्यातील चोरीचा माल अमजद खान याला विकल्याचे सांगितल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून 1,76,750 रुपये किंमतीचे 350 किलोच्या तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत.

तसेच इतर आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मारुती 800 कार, एक पॅशन प्लस मोटर सायकल,चार मोबाईल फोन असा 1.60 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सर्वांकडून एकूण 3.36 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

या पाच आरोपींना अपर व सत्र न्यायालय, बारामती यांनी तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली असून त्यांच्याकडून यवतमाळ पोलीस ठाण्यातील आणखी 4 रोहित्र चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपी दत्ता शिंदे, रा. राहू, तालुका दौंड हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून तो यवत पोलीस ठाण्यातील 26 गुन्ह्यात फरार होता. तर आरोपी महादेव उर्फ सोन्या पवार आणि राज वानखेडे रा. केडगाव, तालुका दौंड हे यवत पोलीस ठाण्यातील 11 गुन्ह्यात फरार होते.

 

ही कारवाई डॉ अभिनव देशमुख, पोलूस अधिकक्षक पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते, अपर पोलीस अधीक्षक, राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस निरीक्षक संजय नागरगोजे व त्यांच्या टीमने केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.