Tree Plantation: 15 तासांचे श्रमदान करत साजरी झाली आषाढी एकादशी

एमपीसी न्यूज: पिंपरी चिंचवड मधील इंद्रायणी नगर येथे असलेल्या निसर्गबेटसाठी सलग 15 तासांचे श्रमदान करण्यात आले.(Tree Plantation) वृक्षमित्र, निसर्ग राजा मित्र जीवांचे व बाली टीम च्या सदस्यांनी श्रमदान केले. जवळपास 55 खड्डे तयार करून त्यात विविध रोप लावण्यात आली.

 वृक्षमित्र, निसर्ग राजा मित्र जीवांचे व बाली टीम च्या सदस्यांनी सलग 15 तासांचे श्रमदान केले. सकाळी 6.30 ते 10.30 पर्यंत जवळपास 55 खड्डे तयार करण्यात आले. (Tree Planation) त्यानंतर झाडांना माती लागणार होती त्यामुळे दिघी येथील निसर्ग राजाच्या नर्सरीमधून माती व काही फुलांची रोपे तसेच सह्याद्री देवराईच्या लाला माने यांनी काही फुलांची रोपे दिली. माणिक धर्माधिकारी व मारुती साळुंखे यांनी यासाठी श्रमदान केले. तेथून थेट बबन पोकळे यांच्या सन राईज नर्सरी मधून दुर्मिळ फुलांची झुडूप, वेली व वृक्षांची रोप आणण्यात आली. काही जुनी काही नवीन अशी 70 प्रकारची रोप गोळा करण्यात आली.
संध्याकाळी 6 वाजता सर्वजण जमायला लागले तसा पाऊसही वाढला अंधार पडत होता या परिस्थितही रोपे लावण्याचे ठरले. भर पावसात रोप लावायला सुरुवात झाली. रोप खड्यांजवळ ठेवत व पावसाने भिजलेली माती ओढत सर्वांनी रोपे लावली.

 

सर्कलला फिरायला आलेले टाटा मोटर्स युनियन चे अध्यक्ष व वृक्षमित्र भैया साहेब लांडगे व संतोध गाढवे यांनी देखील टीम सह वृक्षारोपण केले. रात्री 9.30 वाजता चहाचा आस्वाद घेत श्रमदान संपले व सर्वजण घराकडे निघाले. संपूर्ण कपडे चिखलाने भरलेलं व पावसाने भिजून गेले होते.
माणिक धर्माधिकारी, मारुती साळुंखे, राहुल घोलप, संजय कुलकर्णी, राहुल जवळकर अनंत हेंद्र व टीम, मनोज चौधरी, विश्वजित डोंगरे, महेश महिंदरकर, सागर वाघ, अतुल वाघ, रवींद्र पानसरे, स्वप्नील अहिरराव व इतरांनी श्रमदान केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.