Lonavla Body Found: भुशी डॅममध्ये वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

एमपीसी न्यूज:  लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक युवक सोमवारी दुपारी भुशी धरणात बुडाल्याची घटना घडली होती. (Lonavla Body Found) त्याचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला यश आले आहे. आज दुपारी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

   साहिल सरोज (वय-19, रा.मुंबई) असे या युवकाचे नाव आहे. साहिल आणि त्यांच्या ग्रुपचे सुमारे 250 पेक्षा अधिक सहकारी पाच बसेसने सोमवारी लोणावळा व खंडाळ्यात वर्षाविहार व पर्यटनासाठी आले होते. भुशी धरणाच्या मागील बाजुला असलेल्या धबधब्यातून साहिल पडला व धरणाच्या जलाशयात वाहून गेला होता. लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने घटनास्थळी पोहचून शोध कार्य सुरू केले होते. आज दुपारी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

Dehugaon News: ‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा पालखी सोहळा उत्साहात

काल संध्याकाळी अंधार झाल्याने शोधकार्य बंद करण्यात आले होते. आज सकाळी 8 वाजता शोधकार्य परत सुरु करण्यात आले. गळाच्या मदतीने आज दुपारी 12 वा चे सुमारास मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
प्रणय अंबुरे, प्रविण देशमुख,अजय शेलार, समीर जोशी, ओंकार पडवळ , आयुष वर्तक, महेश मसने, राजेंद्र कडु, कुणाल कडु, रोहीत वर्तक, सागर कुंभार, सुनिल गायकवाड या रेस्कूय टीमच्या मदतीने हे शोध कार्य पार पडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.