YCMH : यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयामध्ये मानधनावर 64 डॉक्‍टरांची भरती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयामध्ये  (YCMH) कनिष्ट निवासी, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 64 डॉक्‍टरांची सहा महिन्यांसाठी मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेच्या वतीने जाहीर प्रकटन करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांनी 9 डिसेंबर या कालावधीत महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या वतीने नागरिकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी सर्वात मोठया वायसीएम रूग्णालयास जिजामाता, आकुर्डी, भोसरी आणि थेरगाव अशी मोठी रूग्णालये सुरू केली आहेत. या पाचही रूग्णालयात अत्याधुनिक सुविधा रूग्णांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालिका रूग्णालयात पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्यातील आणि महाराष्ट्राच्या अनेक भागातील रूग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेवर दिवसेंदिवस ताण येत आहे. तथापि, वायसीएम रूग्णालयास इतर रूग्णालयातही डॉक्‍टरांच्या पदांसह इतर पदाची सातत्याने कमतरता जाणवत आहे. याचा विचार करून वेळोवेळी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे.

वायसीएम रूग्णालयात विविध विभागांसाठी 64 डॉक्‍टरांची कमरता आहे. यामध्ये कनिष्ठ निवासी डॉक्‍टरांसाठी मेडीसीन विभाग 14, गायनॅकसाठी 7, दंतरोग तज्ञ 3, डायलेसिस 2, बालरोग आयसीयू 3, इमर्जन्सी वॉर्ड 3, आयसीयू 20, उरोरोग 2 अशी पदे भरण्यात येणार आहेत. या पदावर काम करणाऱ्या डॉक्‍टरांना सीएमओ, शिफ्ट ड्युटी, आयूसीयू, पोस्टमार्टेम, बीटीओ अशा ठिकाणी काम करावे लागणार आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी म्हणून सीएमओ विभागासाठी 5, वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटीसाटी 3, ब्लड बॅंकेसाठी 2 अशी 10 पदे भरण्यात येणार आहेत. डॉक्‍टरांची (YCMH) ही भरती करताना शैक्षणिक अर्हता आणि अनुभवानुसार मानधन देण्यात येणार आहे. ही भरती सहा महिन्यांसाठी असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. 3 ते 9 डिसेंबर या कालावधीत महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या सर्व पदांची भरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महापालिकेत दर सोमवारी मुलाखती होणार आहेत.

PCMC News : सात विद्यार्थी होणार लखपती

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.