PCMC News : सात विद्यार्थी होणार लखपती

एमपीसी न्यूज – दहावीच्या (PCMC News) परीक्षेत 80 टक्क्‌यांपेक्षा जादा गुण संपादन करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालयातील 140 गुणवंत विद्यार्थ्यांना आणि 10 दिव्यांग विद्यार्थ्यांना महापालिकेमार्फत बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये सात विद्यार्थ्यांनी यंदा एक लाखाचे बक्षिस पटकावले आहे. या विद्यार्थ्यांच्या बक्षिसापोटी महापालिकेचा 56 लाख 75 रूपये खर्च होणार आहे.

दहावीच्या परीक्षेत 80 टक्क्‌यांपेक्षा जादा गुण संपादन करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना महापालिकेमार्फत रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात येते. यंदा दहावी परीक्षेचा निकाल 17 जून रोजी जाहीर झाला. महापालिका माध्यमिक विद्यालयांचा निकाल यंदा 89 टक्के लागला आहे. सन 2008-2009 पासून ही योजना महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून या योजनेत व धोरणात बदल करण्यात आला. त्यानुसार, महापालिकेच्या 18 माध्यमिक विद्यालयातील 90 टक्क्‌यांपेक्षा जादा गुण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रूपये बक्षीस देण्यात येणार आहे.

85 ते 89.99 टक्क्‌यांपर्यंत गुण मिळविणाऱ्या 46 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 हजार रूपये बक्षीस मिळणार आहे. तर, 80 ते 84.99 टक्के गुण मिळविणाऱ्या 87 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार रूपये बक्षीस मिळणार आहे. तसेच 35 टक्क्‌यांपेक्षा जादा गुण मिळविणाऱ्या आणि 40 टक्के अपंगत्व असलेल्या 10 दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 हजार रूपये बक्षीस देण्यात येणार आहे. असे एकूण 150 विद्यार्थी (PCMC News) महापालिकेच्या बक्षिसाचे मानकरी ठरले असून त्यांच्या बक्षिसापोटी 56 लाख 75 हजार रूपये खर्च होणार आहे. सन 2022-23 मध्ये माध्यमिक विभागाकडील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ या लेखाशीर्षावर 50 लाखाची तरतुद आहे. या तरतुदीमधून अद्यापपर्यंत काहीही रक्कम खर्च पडलेली नाही. परंतु, या बक्षिसासाठी 56 लाख 75 हजार रूपये खर्च आहे. त्यामुळे या लेखाशीर्षावर आणखी आठ लाख रूपये तरतूद केली जाणार आहे.

गुण, विद्यार्थी, संख्या, बक्षीस, रक्कम एकूण रूपये – PCMC News

90 टक्क्‌यांपेक्षा जास्त 07 1,00,000 7,00,00085 ते 89.99 टक्के 46 50,000 23,00,000
80 ते 84.99 टक्के 87 25,000 21,75,000
दिव्यांग विद्यार्थी 10 50,000 5,00,000
एकूण 150 56,75,000

Sports News : जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत अमृता विद्यालय आणि सिटी इंटरनॅशनल स्कूलची बाजी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.