Dapodi : दापोडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – दापोडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक करत त्याच्याकडून चार किलोपेक्षा अधिक (Dapodi) गांजा जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. 25) सायंकाळी सव्वासात वाजता करण्यात आली.

सागर सुरेश पवार (वय 27, रा. माणकेश्वर, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने हा गांजा सचिन साळुंखे (रा. मोहोळ, जि. सोलापूर) याच्याकडून आणला असल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथे बीआरटी बस थांब्या जवळ एकजण आला असून त्याच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली.

Hinjawadi : क्रेडीट कार्डचा प्रोटेक्शन प्लान डिसेबल करण्याच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन सागर पवार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 4.473 ग्राम (Dapodi) वजनाचा गांजा आणि 15 हजारांचा एक मोबाईल फोन असा एकूण चार लाख सात हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याने हा गांजा सचिन साळुंखे याच्याकडून पिंपरी-चिंचवड शहरात विक्रीसाठी आणला असल्याचे समोर आले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.