• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
23 Jun 2017


महा रोलबॉल लीग स्पर्धा

एमपीसी न्यूज -  चुरशीच्या लढतीत औरंगाबाद वॉरियर्स संघाने नाशिक बुल्स संघाला पराभूत करताना महा रोलबॉल लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली.

शिवछत्रपती क्रीडा नागरी, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आजपासून सुरू झालेल्या महा रोलबॉल लीग स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष विनीत कुबेर, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे कार्यकारिणी सदस्य नामदेव शिरगांवकर, औरंगाबाद वॉरियर्स संघमालक अमित कुलकर्णी, मुंबई टायगर्सचे संघमालक शैलेश पाटील, नागपूर ईगल्सचे संघमालक राजेंद्र व दिपाली गायकवाड, ठाणे पँथर्सचे संघमालक मिलिंद देशमुख, रॉयल पुणेचे संघमालक प्रकाश बालवडकर, पिंपरी-चिंचवड चालेंजर्सचे संघमालक आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते. 

औरंगाबाद वॉरियर्स व नाशिक बुल्स संघादरम्यान सलामीची लढत झाली. औरंगाबाद वॉरियर्सच्या राजेंद्र सिंगाडीयाने नाशिक बुल्सचा बचाव भेदत लढतीतील 14 व्या मिनिटाला गोल करताना संघाला आघाडी मिळवून दिली. औरंगाबाद संघाने मिळविलेली 1-0 ही आघाडी मध्यंतरापर्यंत टिकवली.

मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. मध्यंतरानंतर पहिल्या 20 सेकंदात श्रेयस्थ कक्करने गोल करताना औरंगाबाद संघाची आघाडी 2-0 अशी वाढविली. त्यानंतर पुन्हा औरंगाबाद संघाने पुन्हा एकदा नाशिक बुल्स संघाचा बचाव भेदताना दुसऱ्या मिनिटाला बर्मन कारगिलने गोल केला. यावेळी औरंगाबाद संघाची आघाडी 3-0 अशी झाली. त्यानंतर नाशिक बुल्स संघाच्या भार्गव घारपुरेने 12 व्या मिनिटाला गोल करत 3-1 अशी आघाडी कमी केली. लढतीतील शेवटच्या मिनिटाला नाशिक बुल्सच्या सुशांत सूर्यवंशीने गोल करताना आघाडी 3-2 अशी कमी केली, परंतू तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. औरंगाबाद वॉरियर्सच्या गोलरक्षक प्रतिक सातवेकरने सर्वोत्तम गोलरक्षण केल्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

या लढतीनंतर ठाणे पँथर्स विरुद्ध पिंपरी-चिंचवड चॅलेंजर्स, मुंबई टायगर्स विरुद्ध नागपूर ईगल्स या दोन लढती होणार आहेत.

23 Jun 2017


महाराष्ट्र रोलबॉल लीग उद्यापासून बालेवाडी येथे रंगणार ; स्पर्धेत मुलांच्या 8 तर मुलींच्या 6 संघांचा सहभाग

एमपीसी न्यूज - रोल बॉल खेळाच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी महाराष्ट्र रोलबॉल लीग सारख्या स्पर्धांचे आयोजन करणे महत्वाचे आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमधूनच भारताचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू तयार होतात. हेच खेळाडू आपल्या खेळाच्या जोरावर खेळाला जगभरात पोचवतील व त्यातूनच भारताला एक नवीन ओळख मिळणार आहे, असे मत महाराष्ट्र रोल बॉल संघटनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केले.

भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या वतीने महाराष्ट्र रोलबॉल लीगचे आयोजन करण्यात आले असून त्या संबंधी माहिती देण्यासाठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय रोल बॉल संघटनेचे अध्यक्ष विनीत कुबेर, खेळाचे जनक व महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे, सतीश घारपुरे आदी उपस्थित होते.

आदेश बांदेकर पुढे म्हणाले की, औरंगाबाद वॉरियर्स संघासाठी अभिनेते मंगेश देसाई, कोल्हापूर ड्रॅगन्स संघासाठी संगीतकार अवधूत गुप्ते, मुंबई टायगर्स संघासाठी अभिनेत्री स्पृहा जोशी व अभिनेते उमेश कामत, नागपूर ईगल्स भारत गणेशपुरे, नाशिक बुल्स संघासाठी अभिनेते चिन्मय उदगीरकर, ठाणे पँथर्स संघासाठी अभिनेते संतोष जुवेकर, रॉयल पुणे संघासाठी अभिनेते सुबोध भावे हे प्रचारक म्हणून काम करत आहेत.

यावेळी भारतीय रोल बॉल संघटनेचे अध्यक्ष विनीत कुबेर यांनी स्पर्धेविषयी माहिती देताना म्हणाले की, ही स्पर्धा 23 जून ते 26 जूनच्या दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे रंगणार असून हे स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. या स्पर्धेत मुलांच्या गटात औरंगाबाद वॉरियर्स, कोल्हापूर ड्रॅगन्स, मुंबई टायगर्स, नागपूर ईगल्स, नाशिक बुल्स, पिंपरी-चिंचवड चॅलेंजर्स, ठाणे पँथर्स, रॉयल पुणे या 8 संघांचा तर मुलींच्या गटात औरंगाबाद वॉरियर्स, मुंबई टायगर्स, नाशिक बुल्स, पिंपरी-चिंचवड चॅलेंजर्स, ठाणे पँथर्स, रॉयल पुणे या 6 संघांचा समावेश करण्यात आला आहे.

कुबेर पुढे म्हणाले की, केसरी टूर्स, आयकॉन असोसिएट्स, अमनोरा टाऊन पार्क, धर्मवीर मल्हार स्पोर्ट्स फाउंडेशन, मेडीनिला फार्मा, स्पर्श हॉस्पिटल्स, व्हर्सा प्लास्टिक इंडस्ट्रीज प्रा. ली., महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी संघ खरेदी केली आहे.

खेळाचे जनक व महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे म्हणाले की, थोड्या कालावधीत या खेळाने जगभरात आपले स्थान निर्माण केले आहे. सध्याच्या घडीला 50 पेक्षा जास्त देशात हा खेळ खेळला जातो. या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

योगेश, श्वेता सर्वात महाग खेळाडू

महाराष्ट्र रोल बॉल लीगसाठी झालेल्या लिलावात मुलांच्या गटात जळगावचा योगेश तायडे तर मुलींच्या गटात श्वेता कदम हे सर्वात महागडे खेळाडू ठरले. योगेश तायडेला रॉयल पुणे संघाने तर श्वेता कदमला नाशिक बुल्स संघाने खरेदी केले.

मुले संघ : रॉयल पुणे : संजोग तापकीर (कर्णधार), हर्ष गोयंका, योगेश तायडे, प्रदीपकुमार पुनिया, स्वानंद वैद्य, साहस डूफे, अंकित रावल, शिवम हुडा, सौरभ भागवत, आशुतोष सिंग, प्रद्युम्न बिमल, आदिल बागवान प्रशिक्षक : प्रभाकर वडवेराव

मुली संघ : रॉयल पुणे : मानसी मारणे (कर्णधार), रेवती हिंगवे, ऐश्वर्या सावंत, अनिशा नायर, आभा तुम्मने, नक्षत्रा चव्हाण, रजनी, वंशिका वर्मा, श्रेया पुंडलिक, गर्विता गुप्ता, एस. एस. सुश्मिता प्रशिक्षक : हेमांगी काळे

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) आयोजित डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत सुपर डिव्हिजन श्रेणी गटात परशुरामीयन्स, बीईजी या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

बीईजी येथील फुटबॉल मैदानवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात सुभेदार नाईक प्रशिक्षक चंद्रशेखर पिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली बीईजी संघाने आयफा स्काय हॉक्सचा 4-1 असा पराभव केला. बीईजी संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच वरचष्मा राखला. 14 व्या मिनिटाला परमजित सिंगने दिलेल्या पासवर प्रेमानंदा सिंगने गोल करून संघाचे खाते उघडले. 35 व्या मिनिटाला आयफा संघाचे खेळाडू गाफील असताना रिठा अॅनलने दिलेल्या पासवर चोंगाने संधी साधत गोल नोंदवून संघाची आघाडी 2-0 ने वाढविली. त्यांनतर आयफा संघाच्या ईशान शर्मा, सुरज कदम यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. पूर्वार्ध संपण्यास तीनच मिनिटे शिल्लक असताना बीईजीच्या रिठा अॅनलने सोलो गोल करून संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धात दोन्ही संघानी आक्रमक पवित्र स्वीकारला. 69 व्या मिनिटाला जोरावर सिंगच्या पासवर भगवान दासने सुरेख चाल रचत आयफा संघाच्या बचावफळीवर दडपण निर्माण केले आणि संधीचे गोलात रूपांतर करून संघाला 4-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. आघाडी घेण्यास आयफा संघाने जोरदार चढाया केल्या, परंतु प्रतिस्पर्ध्यांचा बचाव भक्कम राहिला. अखेर सामना संपण्यास सात मिनिटे शिल्लक असताना आयफा स्काय हॉक्सच्या राहुल कड याने एकमेव गोल केला.

दुसऱ्या सामन्यात सतीश अहिरे, हलिव येईबी आणि संग्राम पाटील यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर परशुरामीयन्स संघाने संगम अ संघाचा 3-1 असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

परशुरामीयन्स: 3 (सतीश अहिरे 20 मि., हलिव येईबी 63 मि.(सोलो), संग्राम पाटील 87 मि.पास-हलिव येईबी) वि.वि.संगम अ: 1(सागर डुमरे 68 मि.);

बीईजी: 4 (प्रेमानंदा सिंग 14 मि.पास-परमजित सिंग, चोंगा 35 मि.,पास-रिठा अॅनल, रिठा अॅनल 42 मि.(सोलो), भगवान दास 69 मि. पास-जोरावर सिंग) वि.वि.आयफा स्काय हॉक्स: 1 (राहुल कड 83मि.)

आजचे सामना (25 जून 2017)सकाळी 8.00 वाजता

बिशप्स एफसी वि.फिनिक्स

20 Jun 2017


एमपीसी न्यूज - आयलीग स्पर्धेतील सहभागाबद्दल या गोष्टीचा संबंध नसला तरी इंडियन सुपर लीग स्पर्धेतील संघांना फिफाच्या परदेशी खेळाडूसंबंधी विशिष्ट खेळाच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. या नियमाप्रमाणे त्यांना जास्तीत जास्त चार परदेशी खेळाडूंना खेळविण्याची परवानगी असल्याचे एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी सांगितले.

राजेश वाधवान समूह आणि ह्रितिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्पोरेट सुपर कप स्पर्धेतील विजेत्या संघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

गौरव मोडवेल पुढे म्हणाले कि, भारतातील अग्रगण्य आयलीग फुटबॉल स्पर्धेतील संघ आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघ यांच्यात आशियाई फुटबॉल कॉन्फिडरेशनच्या उपक्रमांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी सुरु असलेला वाद संपण्यासाठी अद्याप काही कालावधी लागणार आहे. यांसंबंधी आम्हांला लेखी सूचना अद्याप मिळालेल्या नसल्या तरी एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशन(एएफसी)कडून आयएसएलला  मान्यता मिळाली आहे आणि जर आयएसएलमधील संघ एएफसीच्या स्पर्धांमध्ये खेळणार असतील तर आम्हांला परदेशी खेळाडूसंबंधी एएफसीचा नियम मान्य करावा लागेन.

आशियाई फुटबॉल फेडरेशनने आयएसएलला नुकतीच अधिकृत मान्यता दिली असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आयलीग स्पर्धांमधील दोनच संघ एएफसी स्पर्धेसाठी पात्र ठरत असल्यामुळे त्यांचा आता या नियमासंबंधी एएफसीशी संघर्ष होऊ घातला आहे. सध्याची आयएसएल स्पर्धेतील परदेशी खेळाडूंसंबंधी नियम आणि धोरण हे एएफसी आणि फिफा नियमांपेक्षा वेगळे आहे. परंतु फिफा आणि एएफसीच्या नियमांप्रमाणे आता आम्हाला परदेशी खेळाडूंची संख्या चारवरच आणावी लागणार असल्याचे मोडवेल यांनी नमूद केले.

आयएसएल आणि आयलीग स्पर्धा  एकाच वेळी खेळविल्या जाणार असल्यामुळे यासंबंधी कोणताही वाद निर्माण करण्याऐवजी अधिकाधिक खेळाडूंना दर्जेदार फुटबॉल खेळण्याची संधी मिळणे महत्वाचे आहे. दोन्ही लीग स्पर्धा एकाच वेळी होत असल्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या संघातील दर्जेदार खेळाडूंना देशातील सर्वोत्तम दर्जाची स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी आयएसएल स्पर्धा खेळण्यासाठी आयलीग संघाच्या खेळाडूंनी क्लबला परवानगी देणे आवश्यक होते. परंतु आता दोन्ही स्पर्धा एकाच वेळी होत असल्यामुळे दोन स्पर्धांमध्ये कोणते वेगळे खेळाडू हे संघांना निश्चित करावे लागणार आहे. तसेच, एकाच वेळी स्पर्धा होत असल्यामुळे व्यावसायिक फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या १०० ते १२० वरून आता थेट ३०० वर पोहोचणार आहे. त्यामुळे अधिकाधिक खेळाडूंना क्लबशी व्यावसायिक करार करण्याची  संधी मिळेल आणि राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी मोठ्या संख्येने गुणवान खेळाडू निर्माण होतील. भविष्यामध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघाला मोठ्या प्रमाणात गुणवान खेळाडू उपलब्ध करून देण्यासाठी हि योजना लाभदायक असल्याचे मोडवेल यांनी सांगितले.

20 Jun 2017


पीवायसी रिबाऊंड स्पोर्टस् 309 रॅकेट लीग स्पर्धा

एमपीसी न्यूज - पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी रिबाऊंड स्पोर्टस् 309 रॅकेट लीग स्पर्धेत उपांत्य फेरीत कुकरीज, मस्कीटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबल टेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मस्कीटर्स संघाने एक्सकॅलिबर्स संघाचा २७१-२५९ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. टेनिसमध्ये आदित्य देशपांडे, रिया जोशी, आदित्य अभ्यंकर, आरिन माळी, तुषार नगरकर, अमित महाजनी, सारंग पाबळकर, मिहीर केळकर  यांच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर मस्कीटर्स संघाने एक्सकॅलिबर्स संघाचा १०२-७३असा पराभव करून सामन्यात २९गुणांची आघाडी घेतली.त्यानंतर टेबल टेनिसमध्ये सुमेध शहा, रणजित पांडे, अंकुश जाधव, अश्विन शहा, अद्वैत जोशी, आर्य देवधर, मधुर इंगहाळीकर, अभिषेक ताम्हाणे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एक्सकॅलिबर्स संघाने मस्कीटर्सचा ९९-७१ असा पराभव करून आघाडी कमी केली. बॅडमिंटनमध्ये मस्कीटर्स संघाने एक्सकॅलिबर्सचा ९८-८७असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कुकरीज संघाने सेबर्स संघाचा २५७-२५४ असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:

मस्कीटर्स वि.वि.एक्सकॅलिबर्स २७१-२५९

टेनिस: मस्कीटर्स वि.वि.एक्सकॅलिबर्स १०२-७३(खुला दुहेरी गट: आदित्य देशपांडे/रिया जोशी वि.वि.मधुर इंगहळीकर/अभिषेक ताम्हाणे ३१-२१; जम्बल दुहेरी गट: सचिन अभ्यंकर/ईशान तळवलकर पराभूत वि.नेहा ताम्हाणे/अंकुश जाधव १४-१५; किड्स दुहेरी गट: आदित्य अभ्यंकर/आरिन माळी वि.वि.अद्विक नाटेकर/तनिश बेळगळकर ११-४; जम्बल दुहेरी गट: तुषार नगरकर/अमित महाजनी वि.वि.आर्य देवधर/शिव जावडेकर १५-१४; खुला दुहेरी गट: सारंग पाबळकर/मिहीर केळकर वि.वि.सुचिता जोशी/रणजित पांडे  ३१-१९);

टेबल टेनिस: मस्कीटर्स पराभूत वि.एक्सकॅलिबर्स ७१-९९(खुला दुहेरी गट: तुषार नगरकर/तेजस किंजीवाडेकर पराभूत वि.सुमेध शहा/रणजित पांडे १२-३१; जम्बल दुहेरी गट: प्रशांत वैद्य/मकरंद चितळे पराभूत वि.अंकुश जाधव/अश्विन शहा १०-१५; किड्स दुहेरी गट: आदित्य अभ्यंकर/आरिन माळी वि.वि.आरुशी पांडे/तनिश बेलगळकर ११-६; जम्बल दुहेरी गट: केदार तळवलकर/राधिका इंगहाळीकर पराभूत वि.अद्वैत जोशी/आर्य देवधर १४-१५; खुला दुहेरी गट: प्रणव मराठे/मिहीर कुलकर्णी पराभूत वि.मधुर इंगहाळीकर/अभिषेक ताम्हाणे २४-३१);

बॅडमिंटन: मस्कीटर्स वि.वि.एक्सकॅलिबर्स ९८-८७(खुला दुहेरी गट: ईशान तळवलकर/तेजस किंजीवाडेकर वि.वि.आर्य देवधर/अंकुश जाधव ३१-२९; जम्बल दुहेरी गट: तुषार नगरकर/राजशेखर के. वि.वि.दीपा खरे/ऋत्विक गाडगीळ १५-११; किड्स दुहेरी गट: ईशान लागू/आदित्य अभ्यंकर वि.वि.आरुशी पांडे/अद्विक नाटेकर ११-४; जम्बल दुहेरी गट: तन्मय आगाशे/राधिका इंगहाळीकर वि.वि.अद्वैत जोशी/अश्विन शहा १५-१२; खुला दुहेरी गट: मकरंद चितळे/मिहीर केळकर पराभूत वि.सुमेध शहा/रणजित पांडे २६-३१);

कुकरीज वि.वि.सेबर्स २५७-२५४

टेनिस: कुकरीज बरोबरी वि.सेबर्स ८५-८५(खुला दुहेरी गट: अमोघ बेहेरे/अभिजित गानू पराभूत वि.गौरव भगत/आदित्य भावे २१-३१; जम्बल दुहेरी गट: संग्राम पाटील/अंकित दामले पराभूत वि.सतीश भगत/अभिजित केळकर ११-१५; किड्स दुहेरी गट: वरून खरे/रुचीता जना वि.वि.आदित्य वर्धन/सानिया ११-३;जम्बल दुहेरी गट: अमोघ बेहेरे/भाग्यश्री देशपांडे वि.वि.रवी रावळ/जय पांडे १५-५;खुला दुहेरी गट: पराग चोपडा/शैलेश लिमये पराभूत वि.सारंग देवी/केदार देशपांडे २८-३१);

टेबल टेनिस:कुकरीज पराभूत वि.सेबर्स ८७-९१(खुला दुहेरी गट:आशिष बोडस/श्रीदत्त शानबाग पराभूत वि.केदार देशपांडे/अभिजित केळकर २१-३१; जम्बल दुहेरी गट:संदीप साठे/संग्राम पाटील वि.वि.विक्रांत पाटील/ईशा पाठक १५-९; किड्स दुहेरी गट:वरून खरे/वेदांत चोपडा पराभूत वि.आदित्य/सलोनी तपस्वी ६-११; जम्बल दुहेरी गट:शैलेश लिमये/जयंत महाबळे वि.वि.आदित्य भावे/सारंग देवी १५-९; खुला दुहेरी गट:पराग चोपडा/शिल्पा शिंदे पराभूत वि.ईशान/गौरव भगत ३०-३१);

बॅडमिंटन:कुकरीज वि.वि.सेबर्स ८५-७८(खुला दुहेरी गट: केदार नाडगोंडे/अंकित दामले पराभूत वि.सुधांशू एम./राजश्री भावे १६-३१; जम्बल दुहेरी गट: आकाश सूर्यवंशी/परम जोशी वि.वि.बाळ कुलकर्णी/ईशा पाठक १५-४; किड्स दुहेरी गट:प्रथम वाणी/वरून खरे वि.वि.सलोनी तपस्वी/साम्या ११-२; जम्बल दुहेरी गट:केदार नाडगोंडे/पराग चोपडा वि.वि.मेधा एम./अनिकेत एस.१५-१०; खुला दुहेरी गट:संग्राम पाटील/अदिती रोडे पराभूत वि.विक्रांत पी./ईशान के.२८-३१).

20 Jun 2017


एमपीसी न्यूज - मॉरिशस इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरी गटात महाराष्ट्राच्या व निखील कानेटकर बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीच्या संयोगिता घोरपडे हिने प्राजक्ता सावंत हिच्या साथीत खेळताना उपविजेतेपद मिळवले.


मॉरिशय येथील रोज हिल मधील राष्ट्रीय बॅडमिंटन सेंटरमध्ये झालेल्या या स्पर्धेत चोवीस वर्षीय संयोगिता हिला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. संयोगिताने प्राजक्तासह खेळताना अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती. या फेरीत जर्मनीच्या लिसा कामिन्स्की व हॅना पोहल या जोडीने त्यांचा 21-18, 22-20 असा 40 मिनिटांमध्ये व सरळ सेटमध्ये पराभव केला.


आपल्या दुखापतीमधून सावरत फेब्रुवारी 2017 मध्ये पर्दापण करणार्‍या संयोगिताची हि पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. उपांत्य फेरीत या संयोगिता आणि प्राजक्ता या जोडीने दुसर्‍या मानांकित आणि मालदिवच्या माईसा फतुल्ला इस्माईल व नाफाह नासरूला या जोडीचा 21-1, 21-5 असा सहज पराभव केला होता. हा सामना केवळ 17 मिनिटे चालला.


अंतिम फेरीमध्ये पराभूत होण्याची संयोगिताची ही चौथी वेळ आहे. याआधी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत (बिहार, शिखा गौतमच्या साथीत), अखिल भारतीय वरिष्ठ दुहेरी गटात दावेंगेरे (कर्नाटक, धान्या नायरच्या साथीत) व अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन स्पर्धेत (उत्तरप्रदेश, संय्यम शुल्काच्या साथीत) संयोगिताने उपविजेतेपद मिळवले आहे.

स्पर्धेचा निकालः अंतिमः पराभूत वि. लिसा कामिन्स्की/हॅना पोहल (जर्मनी) 21-18, 22-20;

उपांत्यः वि.वि. माईसा फतुल्ला इस्माईल/नाफाह नासरूला (मालदीव) 21-1, 21-5;

उपांत्यपुर्व - वि.वि. जेमीमाह सांग/शानीआ लेंऊन्ग (मॉरिशिस) 21-4, 21-10;

पहिली फेरीः वि.वि. नीला नाजीब/मुसा शाहूरूनाझ (मालदिव) 21-6, 21-7;

20 Jun 2017

एमपीसी न्यूज - पीसीएमसीज् व्हेराक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू अमन मुल्ला याची इंग्लड येथे क्रिकेट प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. शनिवारी (दि.17) तो मॅचेस्टरला रवाना झाला.

अमनच्या निवडीबद्दल पिंपरी पालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी त्याचा सत्कार केला. महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश कडूसकर, क्रीडा अधिकारी रझाक पानसरे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे उपस्थित होते.

इंग्लंडमधील मॅचेस्टर येथील सेंट पीटर्स येथे प्रशिक्षण होणार आहे. अमनला स्थानिक व आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये खळण्याची संधी मिळणार आहे. अमन मुल्ला हा काळेवाडी येथील बेबीज इंग्लिश मेडियम स्कूलचा खेळाडू असून त्याने 2015 मध्ये 14 वर्षाखालील गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच सन 2016 मध्ये त्याने मुंबई येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व भारतीय संघाचे माझी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या पुढाकाराने अमन मुल्ला याला इंग्लंड येथे मोफत प्रशिक्षणाकरिता जाण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी अॅकॅडमीतील हर्षवर्धन पाटील व सौरभ नवले या खेळाडूंना इंग्लंड येथे मोफत प्रशिक्षणाकरिता पाठिवेल होते. अमन मुल्ला सन 2007 पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे राजू कोतवाल यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे.

19 Jun 2017

एक्सकॅलिबर्स, सेबर्स, मस्कीटर्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

एमपीसी न्यूज - पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पीवायसी रिबाऊंड स्पोर्टस् 309 रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत कुकरीज संघाने एक्सकॅलिबर्स संघाचा 273-251 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कुकरीज संघाने एक्सकॅलिबर्स संघाचा 273-251 असा पराभव केला. टेनिसमध्ये एक्सकॅलिबर्स संघाने कुकरीज संघाचा 85-79 असा संघर्षपूर्ण पराभव केला. त्यानंतर टेबल टेनिसमध्ये आशिष बोडस, श्रीदत्त शानबाग, संदीप साठे, अनिरुद्ध कोंकर,वेदांत चोपडा, वरून खरे,जयंत एम., शैलेश लिमये यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर  कुकरीज संघाने  एक्सकॅलिबर्स संघाचा 100-82 असा पराभव करून आघाडी घेतली. बॅडमिंटनमध्ये  कुकरीज संघाने एक्सकॅलिबर्सचा 94-84 असा पराभव करून विजय मिळवला. कुकरीजकडून आकाश सूर्यवंशी, शिरीष साठे, प्रथम वाणी, वरून खरे, पराग चोपडा, केदार नाडगोंडे यांनी सुरेख कामगिरी केली. तसेच, याआधी एक्सकॅलिबर्स, सेबर्स, मस्कीटर्स या संघांनीदेखील उपांत्य फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

साखळी फेरी: कुकरीज वि.वि.एक्सकॅलिबर्स 273-251

टेनिस- कुकरीज पराभूत वि.एक्सकॅलिबर्स 79-85 (खुला दुहेरी गट: अमोघ बेहेरे/शैलेश लिमये पराभूत वि.मधुर इंगहळीकर/अभिषेक ताम्हाणे 11-31; जम्बल दुहेरी गट: अंकित दामले/संग्राम पाटील वि.वि.नेहा ताम्हाणे/अंकुश जाधव 15-10 किड्स दुहेरी गट: वरून खरे/रुचिता जना वि.वि.अद्विक नाटेकर/तनिश बेळगळकर 11-2; जम्बल दुहेरी गट: भाग्यश्री देशपांडे/अमोघ बेहेरे वि.वि.शिव जावडेकर/आर्य देवधर 15-11; खुला दुहेरी गट: अभिजित गानू/पराग चोपडा वि.वि.रणजित पांडे/सूचिता शहा 27-31);

टेबल टेनिस: कुकरीज वि.वि.एक्सकॅलिबर्स 100-82 (खुला दुहेरी गट: आशिष बोडस/श्रीदत्त शानबाग वि.वि.सुमेध शहा/रणजित पांडे 31-30; जम्बल दुहेरी गट: संदीप साठे/अनिरुद्ध कोंकर वि.वि.अंकुश जाधव/रवी बापट 15-8; किड्स दुहेरी गट: वेदांत चोपडा/वरून खरे वि.वि.आरूशी पांडे/अनिश बेळगळकर 11-2; जम्बल दुहेरी गट: जयंत एम./शैलेश लिमये वि.वि.अद्वैत जोशी/रणजित पांडे 15-11; खुला दुहेरी गट: पराग चोपडा/शीला पांडे पराभूत वि.मधुर इंगहळीकर/अभिषेक ताम्हाणे 28-31);

बॅडमिंटन: कुकरीज वि.वि.एक्सकॅलिबर्स 94-84 (खुला दुहेरी गट: केदार नाडगोंडे/अंकित दामले पराभूत वि.अंकुश जाधव/आर्य देवधर 27-31; जम्बल दुहेरी गट: आकाश सूर्यवंशी/शिरीष साठे वि.वि.दीपा खरे/ऋत्विक गाडगीळ 15-13; किड्स दुहेरी गट: प्रथम वाणी/वरून खरे वि.वि.आरूशी पांडे/अदनिक नाटेकर 11-6; जम्बल दुहेरी गट: पराग चोपडा/केदार नाडगोंडे वि.वि.अद्वैत जोशी/सिद्धार्थ खिंसरा 15-3; खुला दुहेरी गट: संग्राम पाटील/आदिती रोडे पराभूत वि.सुमेध शहा/रणजित पांडे 26-31).

18 Jun 2017


एमपीसी न्यूज - अखिल भारतीय ज्युनिअर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षाखालील गटामध्ये 16 वर्षीय व निखील कानेटकर बॅडमिंटन अ‍ॅकॅडमी (एनकेबीए) च्या पूर्वा बर्वे हिने विजेतेपद मिळवले.

केरळ येथील तिरूअनंतपूरम येथे ही स्पर्धा झाली. फॉर्ममध्ये असणार्‍या पूर्वाने या विजेतेपदाआधी योनेक्स-इटालीयन ज्युनिअर आणि इस्त्राईल खुल्या 2017 स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. हे तिचे सलग तिसरे विजेतेपद ठरले.

पूर्वाने अंतिम फेरीत कर्नाटकाच्या अश्‍विनी भट हिचा 26-24, 21-13 असा केवळ 37 मिनिटांमध्ये सरळ सेटमध्ये पराभव केला. मूळ्च्या केरळच्या असणार्‍या व 9 व्या मानांकित पूर्वा हिने आपल्या विजेतेपदामध्ये तीन मानांकित खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविला.

उपांत्य फेरीत पूर्वाने मुग्धा आंग्रे हिचा 21-11, 22-24, 21-13 असा तर उपांत्यपूर्वफेरीत सहाव छत्तीसगढच्या अक्रशी कश्यप हिचा 21-17, 21-18 असा सरळ सेटमध्ये पराभव ठोकला.
जागतिक 42 मानांकन असणार्‍या पूर्वासलग 18 सामने अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. आपल्या विजेतेपदानंतर बोलताना पूर्वा म्हणाली की, सलग विजेतेपदानंतर माझा आत्मविश्‍वास वाढला. अकादमीकडून मिळणारा पाठिंबाही उल्लेखनीय आहे. माझा अनुभव आणि निखील सरांच्या मार्गदर्शनामुळे मला हे यश मिळाले आहे.

एनकेबीएचे संचालक व मुख्य प्रशिक्षक निखील कानेटकर म्हणाले की, पूर्वाच्या या अभूतपूर्व यशाचा मला अभिमान आहे. आव्हानांना ती ज्या पद्धतीने सामोरी गेली ते नक्कीच कौतुकास्पद आहे.

स्पर्धेचा निकालः अंतिमः वि.वि. अश्‍विनी भट 26-24, 21-13 - 37 मि.

उपांत्यः मुग्धाअग्रे 21-11, 22-24, 21-13; 60 मि.

उपांत्यपूर्वः अक्रशी कश्यप 21-17, 21-18; 31 मि.

तिसरी फेरीः तनिष्क एम. 18-21, 21-15, 21-12; 50 मि.

दुसरी फेरीः केयुरा मोपट्टी 21-16, 21-17; 45 मि.

पहिली फेरीः पुढे चाल वि. विनोना एस.

17 Jun 2017

एमपीसी न्यूज - बीडब्ल्युएफ पॅरा-बॅडमिंटन जागतिक मानांकनात पुण्याच्या सुकांत कदम याने जागतिक क्रमवारीमध्ये तिसर्‍या क्रमांकावर झेप मारली. युगांडा स्पर्धेतील सुवर्णपदक आणि तुर्की स्पर्धेतील रौप्यपदकांमुळे 100 गुणांची कमाई करत तिसर्‍या क्रमांकावर उडी घेतली.

आठव्या क्रमांकावर असणार्‍या सुकांतला पहिल्यांदाच जागतिक क्र. 3 चे स्थान मिळवता आले आहे. त्याने ही कामगिरी एकेरीतील एसएल 4 या क्लासमध्ये केली आहे. सुकांत याने एप्रिल आणि मे 2017 मध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. युगांडा पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय 2017 स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवले. तुर्कीमधील अ‍ॅन्टाल्या येथे झालेल्या तुर्कीश पॅरा बॅडमिंटन आंतराष्ट्रीय स्पर्धेत सुकांतने रौप्यपदक मिळवले. या दोन्ही स्पर्धांमध्ये त्याला अनुक्रमे 75 आणि 30 गुण मिळाले, त्यामुळे सुकांतचे 165.0 गुण झाले.  24 वर्षीय सुकांतची ही कामगिरी पॅरा बॅडमिंटन खेळाडूंच्या मानांकन यादीमधील तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. सुकांत शिवाय पारूल परमार ही महिला गटातील एसएल 3 यामध्ये जागतिक क्र.1 असून याशिवाय मनोज सरकार हे पुरूष गटात एसएल 3 मध्ये जागतिक क्र. 2 ला आहे.

यादीः सर्वोत्तम 5
1) ल्युकस माझूर (फ्रान्स्) - 362.5 गुण;


2) बाकरी ओमर (मलेशिया) - 205 गुण;


3) सुकांत कदम - 165 गुण;


4) सुहास लालिनखरे (भारत) - 162.5 गुण;


5) तरूण धिल्लॉन (भारत) - 150 गुण.

Page 1 of 17
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start