Pune News : पुणे शिक्षक मतदार संघात सकाळी दहा पर्यंत 11.38 टक्के मतदान

 एमपीसी न्यूज – पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 11.38 टक्के मतदान झाले आहे.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पाच जिल्ह्यात 45 हजार 194 पुरुष तर 27 हजार 327 महिला मतदार आहेत. त्याचबरोबर 24 तृतीयपंथी शिक्षक मतदार आहेत. यातील 6 हजार 414 पुरुष तर 1 हजार 838 महिला मतदारांनी पहिल्या दोन तासात (सकाळी दहा वाजेपर्यंत) मतदान केले आहे. एकूण 72 हजार 545 शिक्षक मतदारांपैकी 8 हजार 252 शिक्षक मतदारांनी दहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.

सकाळी दहा वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले आहे. एकूण 11.38 टक्के मतदान झाले आहे.

जिल्हावार झालेले मतदान

पुणे (एकूण – 10 वाजेपर्यंत झालेले मतदान)

पुरुष – 15807 – 1668

महिला – 16371 – 940

तृतीयपंथी – 23 – 0

एकूण – 32201 – 2608 (8.10 टक्के)

सातारा (एकूण – 10 वाजेपर्यंत झालेले मतदान)

पुरुष – 5121 – 697

महिला – 2589 – 124

तृतीयपंथी – 1 – 0

एकूण – 7711 – 825 (10.55 टक्के)

सांगली (एकूण – 10 वाजेपर्यंत झालेले मतदान)

पुरुष – 4826 – 741

महिला – 1986 – 178

तृतीयपंथी – 0 – 0

एकूण – 6812 – 919 (13.49 टक्के)

सोलापूर (एकूण – 10 वाजेपर्यंत झालेले मतदान)

पुरुष – 10561 – 1487

महिला – 3023 – 188

तृतीयपंथी – 0 – 0

एकूण – 13584 – 1675 (12.33 टक्के)

कोल्हापूर (एकूण – 10 वाजेपर्यंत झालेले मतदान)

पुरुष – 8879 – 1821

महिला – 3358 – 408

तृतीयपंथी – 0 – 0

एकूण – 12237 – 2229 (18.22 टक्के)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.