Pimpri News : सरकारच्या त्रिसूत्री कार्यक्रमाला नागरिकांचा हरताळ 

एमपीसी न्यूजदिवाळीनंतर देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल आणि पुन्हा लॉकडाउन नको असेल तर सरकारने घालून दिलेल्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन सरकाने केले आहे. मात्र, नागरिकांना या त्रिसूत्रीचे वावडे असल्याचे दिसून येत आहे

दिवाळीनंतर राज्यात कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. तत्पूर्वी आरोग्य विभागाने राज्यात दुसऱ्या कोरोना लाटेची शक्यता वर्तवली होती. रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाउन करावा लागतो का ? अशी भीती व्यक्त होत असताना प्रशासनाने लॉकडाउन करणार नाही.

मात्र सरकारने घालून दिलेली त्रिसूत्री नागरिकांनी काटेकोरपणे पाळावी अशी सूचना केली. मात्र, सरकारच्या या त्रिसूत्रीचे नागरिकांना वावडे असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा उडालेला फज्जा, मास्क न परिधान करता वावरणे व नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढल्याचे चित्र आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात रुग्ण वाढत आहेत. नागरिक सरकारी सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याने ते आपला जीव धोक्यात घालत आहेत.  प्रशासन विना मास्क वावरणाऱ्या नागरिकांकडून लाखो रुपये दंड वसूल करत आहेत मात्र नियम मोडणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे मास्क परिधान करणे, हातांची स्वच्छता आणि सोशल डिस्टंसिंगवर भर देण्यात यावा. गर्दी जास्त होणारी ठिकाणं- बाजार, मार्केट आणि सार्वजनिक वाहतुकीबाबत मार्गदर्शक सूचनांच काटेकोर पालन करावं असे आवाहन सरकारने केले आहे.

सामनाला दिलेल्या मुलाखतीत लॉकडाऊन लावण्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पुन्हा निर्बंध नको असतील तर जनतेने त्रिसूत्री पाळावी, काही प्रमाण सोडलं तर बरीचशी लोकं ती पाळत आहेत. लॉकडाऊन तो पुन्हा लावाला लागेल का? तर आपण काय पत्करणार? आयुष्य की धोका? हे ठरवा. मला असं वाटतं की जवळपास सगळा महाराष्ट्र आपण उघडलेला आहे. तो पुन्हा बंद करावा अशी माझी काय कोणाचीच इच्छा नाही. पण बंद होऊ न देणं हे प्रत्येकाचं काम आहे असे ते म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.