१ ऑगस्ट : दिनविशेष

What Happened on August 1, What happened on this day in history, August 1. See what historical events occurred, which famous people were born and who died on August 1.

१ ऑगस्ट : दिनविशेष

१ ऑगस्ट – महत्वाच्या घटना

  • १७७४: जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
  • १८७६: कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.
  • १९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४४: पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
  • १९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.
  • १९८१: अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.
  • १९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.
  • १९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • २००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.
  • २००८: अकरा पर्वतारोहणांचा के२ या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला.

१ ऑगस्ट – जन्म

  • ख्रिस्त पूर्व १०: रोमन सम्राट क्लॉडियस यांचा जन्म.
  • १७४४: लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९)
  • १८३५: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर – पुणे)
  • १८८२: भारतरत्‍न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२)
  • १८९९: जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)१९१३: चित्रपट अभिनेते दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२)
  • १९१५: कथाकार कादंबरीकार श्री. ज. जोशी यांचा जन्म.
  • १९२०: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव सांगली येथे जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९६९)
  • १९२४: वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सर फ्रँक वॉरेल यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९६७)
  • १९३२: हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७२)
  • १९४८: मार्वल स्टुडिओ चे संस्थापक एव्ही अराद यांचा जन्म.
  • १९५२: क्रिकेटपटू यजुर्वेंद्र सिंग यांचा जन्म.
  • १९५५: क्रिकेटपटू समालोचक अरुण लाल यांचा जन्म.
  • १९६९: इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहॅम थॉर्प यांचा जन्म.

१ ऑगस्ट – मृत्यू

  • ११३७: फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १०८१)
  • १९२०: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: २३ जुलै १८५६ – रत्‍नागिरी)
  • १९९९: बंगाली साहित्यिक निरादसी चौधरी यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ – किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश)
  • २००५: सौदी अरेबियाचा राजा फहाद यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९२१)
  • २००८: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिशनसिंग सुरजित यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९१६)
  • २००८: क्रिकेटपटू अशोक मंकड यांचे निधन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.