Sahakarnagar : सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम कटरने कापून 10 लाख लंपास

एमपीसी न्यूज – सहकारनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम कटरच्या सहाय्याने कापून 10 लाख रुपयांची रोकड लंपास केली. सीसीटीव्हीत कोणतीही हालचाल दिसत नसल्याने बँकेला हा प्रकार लक्षात आला. आज सोमवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सीसीटीव्हीत दोन दिवसांपासून कोणतीही हालचाल दिसत नव्हती. यामुळे बँकेचे अधिकारी आज सोमवारी दुपारी तेथे दाखल झाले. यावेळी एटीएमला कटरने कापून आतील रोकड लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी चोरट्यांनी एटीएम आणि सीसीटीव्हीचे मुख्य बटण बंद करून ठेवले असल्याचे अधिका-यांच्या लक्षात आले. सीसीटीव्ही बंद करून ठेवण्यात आल्याने त्यात चोरीची घटना कैद झाली नाही.

तसेच चोरट्यांनी एटीएमचे शटर देखील बंद केले होते. यामुळे नागरिकांना एटीएम तांत्रिक कारणासाठी बंद आहे, असे वाटले होते. दरम्यान, सहकारनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.