Pune Crime : घराशेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, 28 वर्षीय तरुण अटकेत

एमपीसी न्यूज : घराशेजारी राहणाऱ्या (Pune Crime) दहा वर्षीय मुलीचा 28 वर्षीय तरुणाने वारंवार विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक परिसरात रविवारी हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली असून आरोपी प्रशांत पोपट रेवडे (वय 28) याला अटक करण्यात आली आहे.

Bharati Vidyapeeth : आंदोलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षाची तोडफोड; रिक्षा संघटनेच्या अध्यक्षासह आठ जणांवर गुन्हे दाखल

अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांचे शेजारी आहेत. फिर्यादी यांना दहा वर्षाची मुलगी आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही आरोपीने वारंवार तिला जबरदस्तीने जवळ उडून विनयभंग केला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार (Pune Crime) दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.