Pune : आंबेगाव बुद्रुकमधील इमारतीत फ्लॅटला आग

एमपीसी न्यूज – आंबेगाव बुद्रुक येथे एस्टोनिया रॉयल या इमारतीत दुसऱ्या (Pune) मजल्यावरील सदनिकेत सोमवारी रात्री आगीची घटना घडली. यामध्ये दोन बेडरूम मधील वस्तू जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची ३ वाहने आणि 20 जवान यांनी आग आटोक्यात आणली सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी तसेच जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Pune : मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक आज दुपारी 12 ते 2 राहणार बंद

गणेश कुटे यांच्या सदनिकेला हि आग लागली असून आगीची घटना घडली. त्या वेळी घरातील सदस्य बेडरूममध्ये होते. दरम्यान घरातील कपड्यांना इस्त्री करून झाल्यानंतर इस्त्री गादीवर उभी करून ठेवली होती.

इस्त्री गादीवर पडल्याने आग लागली असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सर्व वस्तू जळून खाक झाल्या. तसेच अन्य रूमचे वायरिंग जळून (Pune) खाक झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.