Chakan : बैलपोळयामुळे अडीचशे बैलांची विक्रमी आवक

एमपीसी न्यूज – खेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या चाकण ( ता. खेड) येथील महात्मा फुले मार्केट यार्ड मध्ये गुरांच्या ( Chakan ) बाजारात आठवड्यावर आलेल्या बैलपोळ्यानिमित्त तब्बल 250  बैलांची विक्रमी आवक होवून अनेक बैलांची विक्री झाली.  बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर चाकण ( ता, खेड) मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर बैलांची खरेदी-विक्री झाली. खास बैलपोळा सणासाठी देखण्या खास शर्यतीच्या गोऱ्ह्यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर झाल्याचे पशुपालक शेतकरी , बैलगाडा चालक, मालक आणि शौकीनांनी सांगितले.

Pune : आंबेगाव बुद्रुकमधील इमारतीत फ्लॅटला आग

उत्तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा भाद्रपद पोळा सहा दिवसांवर आलेला असल्याने बैल बाजारात मोठ्या प्रमाणावर बैलांची खरेदी विक्री झाली. 10ते 40 हजारांचा दर नवीन गोऱ्ह्याना मिळाल्याचे पशुपालकांनी सांगितले.

चाकणच्या बैल बाजारात शर्यतीच्या खिल्लार, म्हैसूर,गावरान, माणदेशी बैलांची खरेदी-विक्री होत आहे. बैल पोळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पशुपालक शेतकऱ्यांनी बैलांच्या खरेदी-विक्रीसाठी येथील बैल बाजारात हजेरी लावली होती.

या बाजारामध्ये खालापुर, खोपोली, पनवेल, कर्जत,कामशेत,पवनानगर तसेच पारनेर, संगमनेर, बिड, नगर, जामखेड, या भागातील त्याचप्रमाणे हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ,खेड,शिरुर इत्यादी तालुक्यातील शेतकरी व व्यापारी जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याकरीता मोठ्या प्रमाणात येतात.

उत्तर पुणे जिल्ह्यात भाद्रपद पोळा 

आषाढ, श्रावण किंवा भाद्रपद आणि कार्तिक महिन्याच्या अमावस्येला प्रदेशपरत्वे आणि रूढी परंपरेनुसार बैल पोळा सण साजरा केला जातो.  विदर्भ, मराठवाडा भागात श्रावण अमावस्येला पोळा म्हणजेच बेंदूर साजरा करण्याची परंपरा आहे. कर्नाटक आणि सीमावर्ती गावांतही बेंदूर साजरा करण्याची परंपरा आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यात मात्र दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या आमावस्येलाच मोठ्या प्रमाणावर बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर चाकण येथील बैल बाजारात शनिवारी पशुपालक शेतकरी बांधव , व्यापारी मोठ्या संखेने बैलांची खरेदीविक्री करण्यासाठी आल्याचे चित्र पहावयास ( Chakan ) मिळत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.