Pune Crime : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दगडाने ठेचून एकाचा खून

एमपीसी न्यूज : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या (Pune Crime) हद्दीतील एका शाळेजवळ 27 वर्षीय तरुणाचा दगडाने मारहाण करून खून करण्यात आला. सुरुवातीला जखमी अवस्थेत सापडलेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अनिल भोसले यांनी याप्रकरणी तक्रार दिली. प्रकाश निवृत्ती रेणुसे (वय 27) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, आंबेगाव खुर्द परिसरातील दुगड (Pune Crime) शाळेजवळ प्रकाश रेणुसे हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. अज्ञात व्यक्तीने त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने रॉडने आणि दगडाने सर्वांगावर मारहाण केली होती. उपचार सुरू असताना 19 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Hadapsar : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने डोक्यात लोखंडी रॉड मारून एकाचा खून

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.