Today’s Horoscope 20 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 20 December 2022
वार – मंगळवार.
20.12.2022
शुभाशुभ विचार- 10 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30
दिशा शूल – उत्तरेस असेल. आजचे नक्षत्र – स्वाती 9.55 पर्यंत नंतर विशाखा.
चंद्र राशी – तुळ.
—————————————-
मेष (शुभ रंग- राखाडी)
भागीदारी तत्त्वावर एखाद्या नवीन उद्योग सुरू करायचा असल्यास आजचा दिवस चांगला आहे. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदारही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहील.

वृषभ (शुभ रंग – क्रीम)
क्षुल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

मिथुन (शुभ रंग – मोतिया)
कला क्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. आज तुम्ही स्वतःचे काही छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च कराल.

कर्क (शुभ रंग – सोनेरी)
आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे वाटेल. वास्तु व वाहन खरेदीच्या मार्गातील अडचणी दूर होतील. कर्जासाठी केलेले प्रस्ताव मंजूर होतील. आशादायी दिवस

सिंह (शुभ रंग – चंदेरी)
आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळून येतील. वाणित मात्र गोडवा असू द्यावा.

कन्या (शुभ रंग – पांढरा)
आज व्यावसायिकांची आर्थिक आवक मनाजोगती राहील. काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाणीत मृदूता ठेवली तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवासात मात्र त्रास संभवतो.

तूळ (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण अनुकूल आहे. सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. उपवारांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक माघार घेतील.

वृश्चिक (शुभ रंग – भगवा)
कौटुंबिक गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल. पण तुम्ही निभावून न्याल. काही जणांना अनपेक्षित पणे दुरसे प्रवास घडणार आहेत. थकित बिले भरावी लागतील.

धनु (शुभ रंग – निळा) – Today’s Horoscope 20 December 2022
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

मकर (शुभ रंग – आकाशी)
उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज कर्तव्यासच प्राधान्य देणे गरजेचे आहे. अतिव्यस्त दिवस.

कुंभ (शुभ रंग – पिस्ता)
आज सज्जनांच्या सहवासात चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना करावा लागेल.

मीन (शुभ रंग – मोरपंखी)
कार्यक्षेत्रात कोणतीही धाडसाची कामे टाळाच. आर्थिक व्यवहार मर्यादे बाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून दोन हात दूरच रहा. झटपट लाभाचा मोह टाळणे गरजेचे आहे. स्वतःवर संयम ठेवा.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

PMC : पुणे महानगरपालिका मोठ्या मालमत्ता कराची थकबाकी वसूल कधी करणार?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.