Hadapsar : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने डोक्यात लोखंडी रॉड मारून एकाचा खून

एमपीसी न्यूज : दारू पिण्यासाठी (Hadapsar) पैसे न दिल्याच्या कारणावरून लेबर काम करणाऱ्या एका व्यक्तीचा डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून खून करण्यात आला आहे. हडपसर परिसरातील मगरपट्टा येथील एका बांधकाम साइटवर हा प्रकार घडला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुचू मनदुवा मुरमु (वय 49) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संजय कुनु चौरसिया (वय 19) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. 19 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. सद्दाम हुमायून हुसेन (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्याकडे आरोपी आणि मयत लेबर काम (Hadapsar) करतात. मगरपट्टा परिसरातील बांधकाम साईड जवळ असणाऱ्या लेबर कॅम्पमध्ये दोघेही राहतात. आरोपी हा मयताला वेळोवेळी दारू पिण्यासाठी पैसे मागून पैसे न दिल्यास त्याला मारहाण करत होता. 19 फेब्रुवारी रोजी देखील आरोपीने त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र पैसे न दिल्याने आरोपीने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने पुचू याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Marketyard Crime : व्हाट्सअप स्टेटसवरून एकावर कोयत्याने वार; पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील प्रकार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.