Pune : संगणक प्रशिक्षकांच्या राज्यव्यापी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पी ए इनामदार इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅकेडमी तर्फे आयोजन

एमपीसी न्यूज- पी ए इनामदार इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अॅकेडमी (पै आयसीटी ) तर्फे संगणक प्रशिक्षकांचे राज्यव्यापी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते . पुणे मनपा ,स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा आणि इतर शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते . 31 जणांच्या उन्हाळी प्रशिक्षण वर्गाचा समारोप 31 मे रोजी झाला . या तुकडीतील 11 गुणवान प्रशिक्षकांना प्रत्येकी 10 हजार रोख पारितोषिक महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते देण्यात आले. हा कार्यक्रम आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) येथे झाला.

राज्यभरातून आलेल्या या प्रशिक्षकांच्या पहिल्या तुकडीला हार्डवेअर ,सॉफ्टवेअर मधील अद्ययावत कौशल्ये शिकविण्यात आली . 1 मे पासून 16 मे दरम्यान हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते . राज्यातील साडेसात हजार विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षक अद्ययावत कौशल्ये प्रशिक्षणामुळे शिकवू शकतील .

पी ए इनामदार इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ऍकेडमी (पै आयसीटी )च्या संचालक मुमताज सय्यद यांनी स्वागत केले आणि उपक्रमाची माहिती दिली . डॉ पी ए इनामदार यांनी प्रशिक्षकांचे कौतुक केले . ‘गरीब आणि मागास विद्यार्थ्यांना संगणक क्रांतीद्वारे प्रगतीची मोठी झेप घेणे शक्य आहे . त्यामुळे संगणक प्रशिक्षण हा आपल्या शिक्षणात प्राधान्याचा विषय असला पाहिजे ‘,असे प्रतिपादन त्यांनी केले

शबाना सय्यद ,अरिफ सय्यद ,शमशेर सय्यद ,पंकज शिंदे ,नझीम शेख ,आलिया सय्यद ,निखत शेख या मुख्य प्रशिक्षकांनी पहिल्या तुकडीला संगणक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.