Thergaon : पुढच्या पिढीला जैन धर्माच्या इतिहासाच समृध्दी देणे गरजेचे – सिध्दार्थ जबडे

एमपीसी न्यूज- अधिवेशनात जैन धर्ममाचा इतिहास व जगाचा इतिहास यांचा मेळ घालण्यात आला. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. युवा पिढी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत आहे. या मोठ्या बदलाचे आपण भागीदार आहोत. सध्या तंत्रज्ञान बदलत असून या बदलत्या तंत्रज्ञानाची सांगड घालून पुढच्या पिढीला जैन धर्माच्या इतिहासाच समृध्दी आपण देणे गरजेचे आहे, असे मत विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरु सिध्दार्थ जबडे यांनी काल थेरगाव येथे व्यक्त केले.

थेरगाव येथे सकल जैन समाज पिंपरी-चिंचवड आयोजित महाराष्ट्र जैन साहित्य इतिहास परिषदेच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोपीय भाषणात ते बोलत होते. अधिवेशनाचा समारोप काल रविवार दि. 3 मेला झाला. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. महावीर अक्कोळे होते. यावेळी महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेचे संस्थापक श्रेणिक अन्नदाते, अधिवेशन संयोजन समितीच्या अध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया आदी उपस्थित होते.

सिध्दार्थ जबडे पुढे म्हणाले की, जैन धर्माचा इतिहास,जैन धर्माचे तत्वज्ञान, शिकवण ही सध्यात्या बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्वांपर्यंत पोहोचायला हवी.सध्याची पिढी वाचनाएवजी मोबाईलवर व्हिडिओ व ऑडिओ एकण्यास प्राधान्य देते. या डिजिटल युगात इतिहासाची माहिती देणारे व्हिडिओ, ऑडिओ तयार करुन युवा पिढीपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.

डॉ. महावीर अक्कोळे म्हणाले, “इतिहासाचे काम केवळ भूतकाळातील घटनांची नोंद करणे नव्हे तर भूतकाळातील संदर्भ देऊन वर्तमान काळातील घटनांवर नजर ठेवून त्यांची नोंद ठेवणे, हेही महत्वाचे आहे”

तत्पूर्वी झालेल्या सत्रात शोधनिबंध वाचन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडीत जितेंद्र राठी होते. या कार्यक्रमांत वंदना अजमेरी यांनी इतिहास मांगीतुंगीचा महावीर उदगीर यांनी मराठवाड्यातील जैन धर्म तर सीमा गांधी यांनी राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषी म.सा. याविषयावर विचार मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेखा कटारिया यांनी केले. भक्ती उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर अंजली शहा यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.