Pimpri corona Update: शहरात आज 108 रुग्णांची नोंद, 151 जणांना डिस्चार्ज, 6 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 151 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 88 हजार 986 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 151 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील चार आणि पालिका हद्दीबाहेरील दोन अशा सहा जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चिंचवड येथील 75 वर्षीय पुरुष, आकुर्डीतील 41 वर्षीय पुरुष, निगडी 64 वर्षीय पुरुष, भोसरीतील 66 वर्षीय पुरुष आणि महापालिका हद्दीबाहेरील परंतु पालिका रुग्णालयात उपचार घेत असताना देहूगाव येथील 54 वर्षीय पुरुष, शिरूर येथील 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 88 हजार 986 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 86 हजार 35 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1551 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 641 अशा 2192 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 732 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 689 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.