BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : शेखर ओव्हाळ युवा मंचतर्फे पूरग्रस्तांसाठी आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – कासारवाडी, दापोडी आणि फुगेवाडी परिसरातील पूरग्रस्त नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेखर ओव्हाळ युवा मंच, पवना मेडिकल फाउंडेशन आणि पवना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून (दि. 9) हे शिबिर सुरू असून दररोज दीड हजार नागरिक या शिबिराचा लाभ घेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी यासह अन्य भागात काही दिवसांपूर्वी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. घराघरांत पाणी शिरून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अन्य गैरसुविधांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. त्यामुळे आजारी पडण्याचा प्रकार वाढू लागला. या पार्श्वभूमीवर शेखर ओव्हाळ युवा मंचने पुढाकार घेऊन आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.

या शिबिरात ब्लड प्रेशर, शुगर यासह सामान्य तपासण्या करण्यात येत आहेत तसेच मोफत औषधेही पुरविली जात आहेत. शिबिराला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. हे शिबिर आणखी सहा दिवस चालणार असून याचा जास्तीतजास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शेखर ओव्हाळ यांनी केले आहे . शिबिरासाठी पवना हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद निकम, डॉ. अभिषेक लाड, डॉ. प्रीती हजारे, डॉ. निपुण जाधव यांच्यासह शेखर ओव्हाळ युवा मंचचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3