Pune : मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – भाजपा प्रभाग क्र 17, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि रघुवंशी युवा मंच यांच्या सहकार्यांने कै. नथुराम उर्फ अण्णा
कोंढरे व कै. सुलोचना नथुराम कोंढरे यांच्या स्मरणार्थ आयोजित मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले. मोहंमदवाडी येथील ह. वि. देसाई नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने
मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये 570 जणांची नेत्रतपासणी , 500 मोफत चष्मे वाटप व 57 जणांवर अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच आधार रक्तपेढीच्या सहकार्याने सुमारे 50 पिशव्या रक्त संकलित करण्यात आले.

यावेळी जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे कसबा विधानसभा मतदार संघाचे चिटणीस तेजेंद्र कोंढरे, भारतीय जनता पार्टीचे कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष नगरसेवक राजेश येनपुरे , सरचिटणीस प्रमोद कोंढरे, पालक संजय देशमुख, भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडी पुणे शहर अध्यक्ष अरविंद कोठारी, स्वीकृत नगरसेवक छगन बुलाखे, राजू परदेशी, रोहिणी नाईक, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचे अध्यक्ष नितीन मेहता, नितीन ठक्कर, जयेश तन्ना, आशा ओसवाल, कल्पेश पटणी, रघुवंशी युवा संघाचे अध्यक्ष रवि बुधानी, भरत अजत, भावीन ठक्कर, जिग्नेश ठक्कर, रमेश ठक्कर आदी उपस्थित होते.

शिबिरासाठी ह. वि. देसाई नेत्र रुग्णालयाचे डॉ. महेश पवार, डॉ. अलका शिंदे व जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.