Talegaon Dabhade : पपईमधून झाले श्रीगणेशाचे दर्शन ; परिसरात कुतूहल

एमपीसी न्यूज- तळेगाव स्टेशन येथील रहिवासी अभिजीत उर्फ टायगर भेगडे व उद्योजक मनोज भेगडे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी घरच्या गणपतीची आरती केल्यानंतर प्रसाद म्हणून पपई कापण्यात आली असता त्यामध्ये श्रीगणेश मुखासारखी प्रतिकृती दिसून आली. त्यामुळे परिसरात कुतूहलाचा विषय बनला.

ऐन गणेशोत्सवात अशी प्रतिकृती दिसणे हा एक वैयक्तिक श्रद्धेचा एक भाग आहे अर्थात झाडाच्या एका फळातून ही प्रतिकृती दिसणे म्हणजे ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश जणू श्रीगणेशाने दिला अशी प्रतिक्रिया टायगर भेगडे यांनी दिली. आगामी काळात याची आठवण राहावी म्हणून शेतात १०० झाडे लावून पर्यावरण संतुलित राखण्याचे कर्तव्य पार पडणार असल्याचे टायगर भेगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.