Chinchwad : इलाईट पॉलिक्लिनिकतर्फे सोमवारपासून महाआरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज- इलाईट पॉलिक्लिनिकच्या वतीने पाच दिवसीय महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे आरोग्य शिबिर 23 ते 27 सप्टेंबर दरम्यान सकाळी 10 ते 4 या वेळेत संभाजीनगर चिंचवड येथील इलाईट पॉलिक्लिनिकमध्ये होणार आहे. या शिबिराचे उदघाटन सोमवारी (दि. 23) सकाळी 10 वाजता नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून औषधोपचार केले जातील. या शिबिराची कार्यक्रम पत्रिका पुढीलप्रमाणे-

23 सप्टेंबर – मूतखडा, लहान मुलांचे आजार,
24 सप्टेंबर – पचनाचे आजार, गर्भसंस्कार
25 सप्टेंबर – त्वचेचे आजार, कान-नाक-घसा यांचे आजार,
26 सप्टेंबर – हृदयरोग, मधुमेह, वजन कमी करणे,
27 सप्टेंबर – मणक्याचे व सांध्यांचे आजार, फिजिओथेरपी

या शिबिरात औषधांवर 20 ते 50 टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. तसेच बीएसएल रँडम 50 रुपयात तर रक्त लघवी तपासणीसाठी 20 टक्के सूट देण्यात येणार आहे. या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून इलाईट पॉलिक्लिनिक, गाळा क्र. 6, पहिला मजला, मंगल आर्केड, रोटरी क्लबच्या समोर, संभाजीनगर, चिंचवड, पुणे – 411033 या ठिकाणी भेट द्यावी किंवा 9370634403 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=469895990274841&id=248205699110539

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like