Pune : गायनातून सादर होणार लोकसंगीतातील ऋतूरंग !

एमपीसी न्यूज- ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘अनुबंध’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी 6 वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमात कजरी, चैती,होरी अशा उपशास्त्रीय रचना सादर होणार आहेत.

या कार्यक्रमात अनुराधा पटवर्धन उपशास्त्रीय रचना सादर करणार आहेत. केदार तळणीकर , नीलिमा राडकर, कुमार करंदीकर हे वादक सहभागी होणार आहेत. रंजना काळे या निवेदन करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 88 वा कार्यक्रम आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.