Bhosari: मतदान यंत्रावर महेशदादा दुस-या तर विलासशेठ अकराव्या क्रमांकावर

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रावर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार पवार राजेंद्र आत्माराम यांना प्रथम तर भाजप-शिवसेना महायुतीचे महेश लांडगे यांना दुस-या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. तर, अपक्ष उमेदवार विलास विठोबा यांना अकराव्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. त्यांचा शेवटून दुसरा क्रमांक येत आहे.

मतदान यंत्रावरील अनुक्रमांकही उमेदवारांना प्रचारासाठी महत्त्वाचा मानला जातो. हा क्रमांक ठरविताना मराठी नावातील अद्याक्षराच्या बाराखडीतील अनुक्रमांकानुसार ठरविण्यात येतो. त्यामध्येही राष्ट्रीय आणि प्रादेशिक नोंदणीकृत व आयोगाची मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांचे क्रमांक आधी ठरविले जातात. त्यानंतर नोंदणीकृत पक्षांना आणि नंतर अपक्षांना स्थान मिळते. उमेदवाराने अर्ज दाखल करताना ज्या पद्धतीने नाव दिले असेल (उदा. नाव किंवा आडनाव प्रथम) त्यातील पहिल्या अक्षराचा निकष अनुक्रमांक लावण्यासाठी ठरविला जातो.

भोसरी विधानसभा मतदारसंघात दोन राष्ट्रीय पक्ष निवडणूक लढवित आहे. बहुजन समाज पार्टी (बसपा) आणि भाजप हे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची नावे मतदान यंत्रावर अगोदर आहेत. तर, राज्यस्तरीय पक्षांच्या नंतर अपक्षांची नावे आली आहेत.

 

 

मतदान यंत्रावर अशी असणार आहेत उमेदवारांची नावे आणि चिन्ह 

1) बहुजन समाज पार्टीचे पवार राजेंद्र आत्माराम – हत्ती

2)  भाजपचे महेश(दादा) किसन लांडगे –  कमळ

3)   जनहित लोकशाही पार्टीचे गजरमल विश्वास भगवान – ऑटो रिक्षा

4)  समाजवादी पार्टीच्या वहिदा शहेनु शेख – सायकल

5)  बहुजन मुक्ती पार्टीचे विजय लक्ष्मण आराख – खाट

6) वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख –  गॅस सिलेंडर

7)  अपक्ष छाया संजय जगदाळे-सोळंके – शिट्टी

8)   डोळस हरेश बाजीराव – चावी

9)  भाऊसाहेब रामचंद्र  आडागळे – शिवणयंत्र

10) मारुती गुंडाप्पा पवार – कपाट

11) लांडे विलास विठोबा –  कप आणि बशी

12)  ज्ञानेश्वर (माऊली) सुरेश बोराटे – तुतारी वाजविणारा माणूस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.