Crime News : परदेशी विद्यापिठात प्रवेश देण्याच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कॅनडा येथील अलगोमा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवून (Crime News) तरुणांकडून 13 लाख 25 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी 2021 ते 7  जानेवारी 2022 या कालावधीत खराळवाडी, पिंपरी येथे घडला.

 

 

दीपक रामधीरज यादव (वय 31, रा. खराळवाडी, पिंपरी. मूळ रा नाशिक) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 15) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनदीप सिंग (रा. उत्तराखंड), पंकज अग्रवाल (रा. कानपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali News : स्पाईन रोड बाधित कुटुंबांना पर्यायी भूखंड वाटपाला सुरुवात

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना कॅनडा येथील अलगोमा युनिव्हर्सिटी येथे प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी फिर्यादीकडून आरोपींनी 13 लाख 25 हजार (Crime News)  रुपये घेऊन त्यांना अलगोमा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. फिर्यादीचा विश्वासघात करून त्यांनी दिलेले पैसे परत न देता फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.