Bhosri : कंत्राटदाराकडून महिला कामगाराचा विनयभंग

एमपीसी न्यूज – कंत्राटदाराने कंपनीतील (Bhosri) कामगार महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार नोव्हेंबर 2021 ते 10 जून 2022 या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीत घडला.

कोतावळे काका (वय 60 , रा. गवळीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Crime News : वर्क फ्रॉम होम शोधणे पडले महागात; महिलेला दिड लाखांचा गंडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एमआयडीसी भोसरीमधील एका कंपनीत काम करत असताना कंत्राटदार आरोपीने त्यांच्याशी गैरवर्तन करून लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यांना लॉजवर आणि घरी भेटण्यासाठी बोलावून त्यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. तसेच, वारंवार शिवीगाळ केली असल्याचेही (Bhosri) फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.