Pune : लिफ्ट मागून प्रौढास 14 हजारांना लुटले

एमपीसी न्यूज – लिफ्ट मागून विनयभंगाचा आरोप करून प्रौढास 14 हजारांना लुटल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नारायण पेठेत राहणाऱ्या एका प्रौढासोबत साधू वासवानी चौकात घडली.

याप्रकरणी नारायण पेठेत राहणा-या एका प्रौढाने बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. तर 28 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निळ्या रंगाची जीन्स आणि गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातलेल्या एका 28 वर्षीय अनोळखी तरुणीने प्रौढास लिफ्ट मागितली व दुचाकीवर बसून काही अंतर पूढे जाताच प्रौढावर विनयभंग केल्याचा आरोप करत भर रस्त्यात आरडाओरडा केला आणि पोलिसात जाण्याची धमकी दिली. प्रौढास ब्लॅकमेल करून त्याच्याजवळ 14 हजारांची मागणी केली. घाबरून गेलेल्या फिर्यादीने वाढायला नको म्हणून घराचा हप्ता भरण्यासाठी जवळ असलेले १४ हजार रुपये त्या तरुणीला दिले. पैसे मिळताच तरुणी तेथून पसार झाली.

याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.