Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे शहरातील इमारतीचे 15 विद्युत मीटर जळून खाक

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे शहरातील (Talegaon Dabhade) एका इमारतीचे 15 विद्युत मीटर जळून खाक झाले आहेत. याबाबत माहिती देताना, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्याने सांगितले, की स्थानिक नागरिक गणेश काकडे यांनी आज पहाटे 5.30 च्या दरम्यान वर्दी दिली. रेल्वे स्थानकजवळील इंद्रायणी वसाहतमधील सह्याद्री सहकारी गृह रचना संस्था येथे विद्युत मीटर बॉक्सला आग लागली आहे.

Pimpri : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ

त्यामुळे लगेच अग्निशमन विभागाचा एक अग्निशमन बंब (Talegaon Dabhade) घटनास्थळावर पोहोचला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. तेथील विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर पाणी मारून आग विझवण्यात आली. बाळु ठाकर, रियाज मुलानी, ताहिर मोमीन, रोहित पवार, गणेश जावळेकर, शेखर खोमणे, निरंजन भेगडे यांनी ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.