Wakad : पावणेदोन लाखांचे रस्ता बांधणी साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – रस्ता बांधण्यासाठी लागणारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना गुरुवार (दि. 18) रात्री साडेनऊ ते शुक्रवार (दि. 19) सकाळी साडेनऊच्या दरम्यान पुनावळे येथे घडली.

विनोद ग्याचंद्र रोहिडा (वय 41, रा. कोकणे चौक, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हे मोहनलाल मथरानी कन्स्ट्रक्शन प्रा. ली. या कंपनीमध्ये व्यवस्थापक पदावर काम करतात. त्यांच्या कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पुनावळे येथील रस्ता बांधणीचे काम मिळाले आहे. हे काम करण्यासाठी कंपनीने रस्ता बांधकामाचे साहित्य ठेवण्यासाठी एक स्टोअर रूम बनवली आहे. ही स्टोअर रूम पत्र्याची आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ ते शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या स्टोअर रूमचे कुलूप तोडून रूम मधील बांधकाम साहित्य चोरून नेले. यावरून विनोद यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक हरीश माने तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.