सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

विविध गंभीर गुन्ह्यांमधील सहा सराईत गुन्हेगार हद्दपार

एमपीसी न्यूज – पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दत्तवाडी, भारती विद्यापीठ, मार्केटयार्ड, बंडगार्डन, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा सराईत गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर विविध स्वरुपातील गंभीर गुन्हे दाखल आहेत.

महेश उर्फ अजिंक्य शिवाजी पवार (24, पवार चाळ, कात्रज) याला एक वर्षासाठी, अर्जून दगडू लंबाडे (19, दांडेकर पूल) व सागर पोपट सोनवणे (20, दांडेकर पूल) या दोघांना शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी, कुणाल सुधीर पिसाळ (21, नाना पेठ), किरण धर्मराज खरात (22, ताडीवाला रोड) याला शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तर अब्बास सुल्तान खान (21, आंबेडकर नगर मार्केट यार्ड) याला शहर व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

हद्दपार करण्यात आलेल्या सहा जणांविरोधात शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर जखमी करणे, दंगा करणे प्राणघातक हत्यारासह हल्ला करणे, घातक शस्त्रे  बाळगणे, शिवीगाळ करणे, असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सहा जणांची पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहशत आहे. तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या सहा जणांना शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश परिमंडळ दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिले आहेत. हद्दपार केलेल्या कालावधीत या पाचपैकी कुणीही शहर किंवा जिल्ह्यात दिसून आल्यास त्याबाबत नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

सराईत गुन्हेगार लॉली माने दोन वर्षासाठी तडीपार

 

शिवाजीनगर परिसरात दहशत असणारा सराईत गुन्हेगार लॉली माने यास दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल उर्फ लॉली सुनील माने (23, कामगार पुतळा)  याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत आहे. त्याच्या विरोधात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पाठविला होता.

त्यानुसार अतुल उर्फ लॉली माने याच्या विरोधात दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिला आहे.

spot_img
Latest news
Related news