महावितरणचा गलथन कारभार! शेतक-याला तब्बल लाखाचे बील

एमपीसी न्यूज – कार्ले भाजे गावातील एका  गरीब शेतकरी कुटुंबाला महावितरणच्या गलथन कारभाराचा फटका बसला आहे. महावितरणतर्फे त्यांना 102 युनिट विजेच्या वापरासाठी तब्बल 1 लाखाचे बिल दिले आहे. बिलाची ही रक्कम पाहता शएतक-याला जबर धक्का बसला आहे.

गणपत मल्हारी ढगे (रा. कार्ला भाजे) असे शेतक-याचे नाव आहे. चार कुटूंबियांसह ते आपल्या दोन खोलीवजा घरात राहतात. दर महिण्याला त्यांना 150 रुपयांच्या आसपास विजबील येते. परंतू जानेवारी महिण्याचे बील हातात पडताच गणपत ढगे यांना धक्काच बसला, कारण बिलाची रक्कम होती थोडीथोडकी नाही तर तब्बल एक लाख सात हजार सहाशे वीस रूपये इतकी होती. आता याप्रकरणी महावितरण काय भूमिका घेते हे पहाणे महत्वाचे ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.