‘नॉव्हेल’च्या विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष विज्ञानाचा आनंद

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी (दि.17) विज्ञान कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी इयत्ता तिसरीचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच शाळेच्या प्राचार्या डॉ कांचन देशपांडे, शाळेच्या विश्वस्थ डॉ. प्रिया गोरखे उपस्थित होत्या.
ही कार्यशाळा चिल्ड्रन्स लायन्स सेंटर येथील अशोक रुपनेर यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी छोट्या छोट्या प्रात्यक्षिकांमधून मुलांना विज्ञानाची सफर घडवून आणली. मुलांना बॉल, स्ट्रॉ, लोहचुंबक, पेन्सिल यासारख्या दैनंदिन व्यवहारातल्या वस्तूंचा वापर करून विविध प्रयोग करून दाखवले. ज्यामुळे मुलांना स्थिर विद्युत, चुंबकीय आकर्षण, वीज निर्मिती, तरंगलांबी (Wavelength), हेलिकॉप्टरची कार्यप्रणाली या सर्व वैज्ञानिक प्रयोगांची माहिती मिळाली. विज्ञानातील गमती जमतींचा त्यांनी आस्वाद घेतला.
यावेळी रुपनेर सर म्हणले की, “ नॉव्हेल इंटरनशनल स्कूल ही अशी एकमेव शाळा आहे. जिथे विद्यार्थी व त्यांचे पालक एकत्रित येऊन विज्ञानाचे प्रयोग करत आहेत आणि याचे मला फार कौतुक वाटत आहे.”या कार्यशाळेचा विद्यार्थी व पालकांनी भरपूर आनंद घेतला.