चंदननगर पोलीस ठाण्यात भाजपच्या चार नवनिर्वाचित नगरसेवकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – आदर्श आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी  भारतीय जनता पक्षाच्या चार नवनिर्वाचित नगरसेवकांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बंदी असतानाही मिरवणूक काढणे या नगरसेवकांच्या चांगलेच अंगलट आले असून चौघांवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.

 

सुनिता मारुती गलांडे, शितल ज्ञानेश्वर शिंदे, योगेश तुकाराम मुळीक आणि संदीप जऱ्हाड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नगरसेवकांची नावे आहेत. ते पुणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमधून वियजी झाले आहेत.

 

विजयी मिरवणूक काढण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी असतानाही त्यांनी याचे उल्लंघन करत आनंदपार्क ते दत्तमंदिर येथील सार्वजनिक रोडवर 150 ते 200 कार्यकर्त्यांसह मिरवणूक काढली. याप्रकरणी त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उप निरीक्षक खलाणे अधिक तपास करीत आहेत.

 

पुण्यात विजयी मिरवणूक आणि फटाके फोडणं भाजपच्या नगरसेवकांना चांगलेच महागात पडले आहे. बंदी असतानाही विजयाची आतषबाजी केल्याने भाजपच्या चार नवनिर्वाचित नगरसेवकांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.