शनिवार, डिसेंबर 3, 2022

पुण्याच्या तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअसवर

एमपीसी न्यूज – फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यापासूनच शहरात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्यातच तापमानाने 36 अंश सेल्सिअसचा पारा गाठल्याची नोंद आज (शुक्रवारी) पुणे वेधशाळेने केली आहे.

 

शहरात दुपारी उन्हाच्या झळा तर सायंकाळी आणि पहाटे बोचणारी थंडी अशा दोन्ही ऋतूंचा अनुभव शहरातील नागरिक घेत आहेत. येत्या काही दिवसातही शहरातील तापमान कमाल 36 ते 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअस राहणार असल्याची नोंदही पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

 

वाढत असलेल्या उन्हाच्या चटक्यांमधून गार पाण्यामुळे थोडा दिलासा मिळावा, यासाठी ठिकठिकाणी मातीच्या माठाचे गाडे लागलेलेही पाहायला मिळत आहे.

Latest news
Related news