गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

पिंपरी महापालिका सभागृहामध्ये 6 बारणे, 5 काटे, 4 लांडगे, 3 गावडे, चिंचवडे 3 आणि 2 लांडे, तापकीर, कलाटे!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत बारणे आडनावाचे सहा, काटे पाच, लांडगे चार, गावडे तीन, चिंचवडे तीन, लांडे, कलाटे, तापकीर, भालकेर, भोंडवे, चिंचवडे, ढोरे, कांबळे, वाघेरे, मोरे, लोंढे आणि गव्हाणे आडनावाचे प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून आले आहेत. तर, जगताप, कदम या प्रमुख राजकीय घराण्यांसह अन्य आडनावाचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बारणे घराण्याचे वर्चस्व पहायला मिळत आहे. यावेळी प्रथमच गजाजन बाबर यांच्या कुटुंबातील एकही सदस्य महापालिका सभागृहात नसणार आहे. 

या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या शिवसेना, भाजप आणि अपक्ष  नगरसेवकांमध्ये बारणे घराण्यातील अर्चना बारणे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, झामाबाई बारणे, माया बारणे, नीलेश बारणे असे सहाजण तर काटे घराण्यातून विठ्ठल काटे, शीतल काटे, रोहित काटे, स्वाती काटे, शत्रुघ्न काटे असे पाच जण निवडून आले आहेत. 

लांडगे घराण्यातील नितीन लांडगे, सारिका लांडगे, रवी लांडगे, राजेंद्र लांडगे, गावडे घराण्यातील अमित गावडे, जयश्री गावडे, राजेंद्र गावडे, चिंचवडे घराण्यातील  करुणा चिंचवडे, सचिन चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, लांडे घराण्यातील विक्रांत लांडे, शाम लांडे, कलाटे आडनावाचे राहुल कलाटे, मयुर कलाटे, विनया तापकीर, सुनीता तापकीर, पंकज भालेकर, प्रविण भालेकर, संगिता भोंडवे, मोरेश्वर भोंडवे,उषा ढोरे, हर्षल ढोरे, उषा वाघेरे, संदीप वाघेरे, अजित गव्हाणे, सोनाली गव्हाणे, शैलजा मोरे, शैलेश मोरे, अश्विनी जाधव, राहूल जाधव, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे निवडून आले आहेत. 

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात जगताप आडनावाचा दबदबा आहे. मात्र, जगताप आडनावाचे एकच नगरसेवक निवडून आला असून तेही अपक्ष निवडून आले आहेत, असे नवनाथ जगताप, पालिकेच्या राजकारणात दबदबा असलेल्या कदम घराण्यातील मंगला कदम, योगेश बहल, डब्बू आसवाणी निवडून आले आहेत. या प्रमुख राजकीय घराण्यांसह अन्य आडनावाचे नगरसेवक निवडून आले आहेत. यावेळी पानसरे आणि शेट्टी घराण्यातील एकही नगरसेवक नाही. 

शहराच्या राजकारणात जगताप, लांडे, लांडगे, बारणे, कदम, बहल पानसरे, बाबर या घराण्यांचेच वर्चस्व राहिल्याचे पहायला मिळते. भाजपचे लक्ष्मण जगताप हे मागील 10 वर्षांपासून चिंचवडचे आमदार आहेत. शिवसेनेचे श्रीरंग बारणे गेल्या तीन वर्षांपासून मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. त्यापूर्वी ते 25 वर्ष महापालिका सभागृहात होते. यावेळी पानसरे कुटुंबातील एकही सदस्य निवडणुकीत उतरली नव्हती. 

अनेक वर्षांपासून माजी खासदार गजाजन बाबर यांच्या घराण्यातील एकतरी सदस्य महापालिका सभागृहात असतो. यंदा बाबर घरण्यातील शारदा बाबर, योगेश बाबर यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला आहे. यावेळी प्रथमच गजानन बाबर कुटुंबातील एकही सदस्य महापालिका सभागृहात नसणार आहे.
Latest news
Related news