ना. धो. महानोर व सुलोचना महानोर यांना यंदाचा यशवंत-वेणु पुरस्कार

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण  प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंत-वेणु पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ निसर्ग कवी पद्मश्री ना. धो.महानोर व त्यांच्या पत्नी सुलोचना महानोर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे 10 मार्चला दुपारी चार वाजता हा सोहळा होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल असणार आहेत. यावेळी आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार उपस्थित असणार आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाजीराव सातपुते  हे यशवंतराव-इतिहासाचे एक पान यावर विचार मांडणार आहेत. यानंतर यशवंतराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार रामचंद्र जाधव, यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्कार बांधकाम उद्योजक सुदाम मोरे, यशवंतराव चव्हाण ग्रामभूषण पुरस्कार आदर्श सरपंच शशिकांत मोरे यांना प्रदान करण्यात येणार आहेत.

तसेच कवी दुर्गेश सोनार, रवी पाईक, भरत दौंडकर, तुकाराम धांडे, संगीता झिंजुरके हे आपल्या कविता सादर करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.