श्री अय्यप्पा धर्म प्रतिष्ठानच्यावतीने " पोंगाला महोत्सव " उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पुण्यातील रास्ता पेठमधील श्री अय्यप्पा धर्म प्रतिष्ठानच्यावतीने हीरक महोत्सवनिमित्त अय्यप्पा मंदिरात  आतुकल भगवती देवीचा " पोंगाला  महोत्सव " आज (सोमवारी) उत्साहात साजरा करण्यात आला.

या उत्सवाचे उदघाटन के एम हॉस्पिटलच्या मुख्य डायनोलॉजीस्ट डॉ. मीरा कुमारी यांच्याहस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आले . यावेळी पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रित निवडणुकीत निवडून आलेल्या वॉर्ड क्र 16 आणि 17 मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. या सरकारमध्ये नगरसेवक वनराज आंदेकर , लक्ष्मी आंदेकर , विशाल धनवडे , सुलोचना कोंढरे , रवींद्र धंगेकर , सुजाता शेट्टी , योगेश समेळ , पल्लवी जावळे आदींचा सन्मानचिन्ह ,श्रीफळ व  पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले .

या उत्सवामध्ये केरळी बांधवानी एकत्रित येऊन देवीला नेवैद्य म्हणून तांदूळ आणि गुळापासून गोड खीर बनविण्यात आली . सकाळपासूनच महिला भगिनीनी उपवास धरला होता . त्यानंतर हि खीर सर्वाना प्रसाद म्हणून वाटली. या कार्यक्रमाचे आयोजन सुभ्रमण्यम अय्यर , शशांक नायर , महेश पौडवाल , राजेश पौडवाल , एम. पी. नायर , जयंती नायर , जगदीश पौडवाल आदींनी केले होते .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.