कलारंग आणि संस्कार भारती पिंपरी -चिंचवडच्या वतीने डॉ. वि.भा.देशपांडे यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज –   कलारंग सांकृतिक कला संस्था आणि संस्कार भारती पिंपरी -चिंचवडच्यावतीने  जेष्ठ नाट्य समीक्षक  डॉ. वि.भा.देशपांडे यांना निगडी येथील संस्थेच्या कार्यालयात आज (सोमवारी) श्रद्धांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व संस्कार भारतीचे कार्याध्यक्ष  अमित गोरखे, सल्लागार अनुराधा गोरखे नगरसेविका पिं. चिं  मनपा, सल्लागार  प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर,राष्ट्रीय स्वंयसंघाचे पुणे कार्यवाह विलास लांडगे, कलारंगचे उपाध्यक्ष शैलेश लेले, संस्कार भारतीचे सचिव सुमित काटकर, साईली काणे, मयुरी जेजुरीकर  व संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी अनुराधा गोरखे  म्हणाल्या की,  डॉ. वि.भा देशपांडे यांनी कला क्षेत्रातील  पाच दशकाहून असलेले योगदान व त्यांनी निर्माण केलेली ग्रंथ संपदा, मराठी नाट्य कोशाची निर्मिती हा अनमोल ठेवा आहे तो जतन करण्याचे  काम आपण सर्वांनी केले पाहिजे..नाट्य क्षेत्रातील ते एक विद्यापीठ होते,अशी भावना गोरखे यांनी व्यक्त केली.

तसेच  राहुल सोलापूरकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, अभ्यासू समीक्षक नाट्य क्षेत्राचा गाढा अभ्यासक व सतत  रंगभूमीवरील कलाकारांना मार्गदर्शक सूचना ते करत असत.कोणत्याही रंगभूमीचा विषयावर त्यांचा अभ्यास होता.मराठी रंगभूमी  वरील त्याचे योगदान कधीही विसरता येणार नाही. 
तर श्रद्धांजली वाहताना अमित गोरखे म्हणाले की , सरांचा मी विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे व मी महाविद्यालयात असताना मराठी भाषा व नाट्य विषयक माहिती सरांकडून आम्हाला मिळायची व कायम नवनवीन उपक्रमाला प्रोत्साहन द्यायचे आमचे एक गुरुतुल्य व्यक्तीमत्व हरपले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.