सांगवीत पूर्ववैमनस्यातून टोळक्याची एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून 15 ते 16 जणांच्या टोळक्याने एकाला लाकडी दांडक्याने आणि दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.15) रात्री साडेअकराच्या सुमारास काटे वस्ती, पिंपळे-सौदागर येथे घडली.

याप्रकरणी रोहन काटे, मयुर काटे, सागर काटे, अविनाश काटे, अतुल काटे, राजाराम काटे आणि विजय काटे (सर्व रा. काटे वस्ती, पिंपळेसौदागर) यांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांच्या 10 ते 12 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवाजी काटे (वय 43, रा. काटे वस्ती, पिंपळेसौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आणि आरोपींची पूर्वी भांडणे झाली आहेत. त्यातून त्यांच्यात वैमनस्य आहे. काटे वस्ती येथील एमएससीबीची वायर कोणीतरी अज्ञाताने तोडली आहे. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवाजी काटे यांनी एका टेम्पो चालकाला थांबवून ठेवले होते. त्यामुळे आरोपींनी जमाव जमवून शिवाजी काटे यांना लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण केल्याचे, पोलिसांनी सांगितले.

सांगवी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.ए.ननावरे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.